मी आधी पैसे काढून घेण्याचे ठरवले तर काही दंड लागू होतात का?

मी आधी पैसे काढून घेण्याचे ठरवले तर काही दंड लागू होतात का?

म्युच्युअल फंड सही आहे?

प्रत्येक ओपन एंडेड स्किम लिक्विडिटीचे(रोख रक्कम काढून घेण्याचे) संपूर्ण स्वातंत्र्य देते, म्हणजेच वेळ आणि काढून घेण्याच्या रकमेवर कोणतेही बंधन नाही. परंतु, काही स्किम्स वर निर्गमन भार लागू करू शकतो.

उदा. एखाद्या स्किममध्ये नमूद केलेले असते की जर एका वर्षाच्या आत रक्कम काढून घेतली तर 1% निर्गमन भर लागू केला जाईल. याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 एप्रिल 2016 मध्ये गुंतवणूक केली असेल, आणि त्याने 31 मार्च 2017 रोजी किंवा त्याआधी जर काही रक्कम काढून घेतली तर एनएव्ही वर 1% दंड लागू होईल. जर गुंतवणूकदाराने 1 फेब्रुवारी 2017 ला एनएव्ही ₹ 200 असताना रोख रक्कम काढली तर ₹ 2 कापले जाऊन गुंतवणूकदाराला ₹ 198 प्रतियुनिट रक्कम परत मिळेल.

निर्गमन भारावरील सर्व माहिती ही सामान्यतः संबंधित स्किमच्या दस्तऐवजांत नमूद केलेली असते. उदा. फंड फॅक्ट शीट किंवा मुख्य माहितीच्या निवेदनपत्रिकेत अशी माहिती दिलेली असते.

458
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे