मी गुंतवणुकीला सुरुवात केल्यानंतर माझ्या गुंतवणुकीच्या मुदतीमध्ये बदल करु शकतो का?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंड्समधील एसआयपीमधील गुंतवणूक आपल्याला बरीच लवचिकता देते. गुंतवणूकदार त्याला गुंतवायच्या असलेल्या रकमेवर, गुंतवणुक मुदतीवर, किती काळासाठी गुंतवणुक करायची (साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक वैगेरे) यावर नियंत्रण ठेवू शकतो.  

पण एकदा आपण एसआयपीला सुरुवात केली की सुरुवातीला जे पर्याय निवडले होते ते एसआयपी मुदत संपेपर्यंत त्यालाआपण बांधील असतो का?  

तर उत्तर आहे- नाही. उदाहरणार्थ, समजा जर आपण एखाद्या फंड मध्ये 7 वर्षासाठी मासिक एसआयपी गुंतवणुक रु. 5000 ने सुरुवात केली, आपण त्या फंडात आपल्या इच्छेनुसार मुदत कमी किंवा जास्त करु शकता तसेच आर्थिक सुबत्तेनुसार एसआयपीचा हप्ता कमी किंवा जास्त करु शकतो. एसआयपी ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. अशा लवचिक वैशिष्ठ्यांमुळे इतर पर्यायांपेक्षा हे अधिक तणावरहित आणि रोख रकमेत रुपांतर करणारे(लिक्विड) असतात

खरंतर, ठराविक कालावधीने नूतनीकरण करण्याच्या आणि एसआयपी वाढवण्याच्या कटकटीपासून दूर राहण्यासाठी, आपण अखंड एसआयपी सुरु राहण्याचा पर्याय निवडू शकतो आणि आपली आर्थिक उद्दीष्टे साध्य होईपर्यंत अडथळ्याविना ते सुरु ठेवू शकतो. गरजेच्यावेळी, आपल्याकडे आपला एसआयपी स्थगित करण्याची लवचिकता असते. मुदतपूर्ती होण्याआधी जर आपल्याला एसआयपी थांबवायची किंवा स्थगित करायची असेल, तर पुढच्या एसआयपीच्या तारखेच्या कमीत कमी 30 दिवस आधी विनंती अर्ज देणे गरजेचे असते.

452
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे