डेब्ट फंड्सचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत?

डेब्ट फंड्सचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

डेब्ट फंड्स हे जे भांडवलाची सुरक्षितता किंवा गुंतवणुकीतून नियमित उत्पन्न आणि/किंवा अल्प काळासाठी पैसे ठेवू इच्छितात अशा गुंतवणूकदारांसाठी असतात.

परंतु डेब्ट फंड्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. 

जसे की बँकेत आपण बचत खाते उघडू शकतो, ज्यामध्ये आपल्याला हवे तेव्हा आपण पैसे काढू किंवा भरू शकतो.  परंतु, आपण ते पैसे काही वेळासाठी वापरणार नसू, तर ते निष्क्रिय ठेवण्यात काही अर्थ नसतो. अशा परिस्थितीत आपण ते पैसे मुदत ठेवीत ठेवा, जिथे पैसे एका ठराविक काळासाठी लॉक होतील आणि आपल्याला त्यावर जास्त व्याजदरही मिळेल. आपण एखाद्या आवर्त ठेवीचा पर्याय निवडू शकाल जिथे प्रत्येक महिन्याला ठराविक काळासाठी आपण एक निश्चित रक्कम गुंतवत राहाल. आपल्या वेगवेगळ्या गरजांसाठी ही उत्पादने आपल्याला मदत करतात.

त्याचप्रमाणे, म्युच्युअल फंड्स मध्ये देखील गुंतवणूकदारांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी डेब्ट फंडच्या प्रकारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जसे की – लिक्विड फंड्स, इन्कम फंड्स, सरकारी सिक्युरिटीज आणि फिक्स्ड मॅचुरिटी प्लॅन्स.

एखाद्या गुंतवणूकदाराला त्याच्या स्वतःच्या गरजांनुसार वेगवेगळ्या स्किम्स निवडण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

453
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे