मला माझी गुंतवणूक कधी काढता येईल?

मला माझी गुंतवणूक कधी काढता येईल?

म्युच्युअल फंड सही आहे?

एखाद्या ओपन एन्ड स्किममध्ये केलेली गुंतवणूक कधीही काढता येते. फक्त जर गुंतवणूक एखाद्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम (ईएलएसएस) मध्ये केलेली असेल, तर त्यात गुंतवणुकीच्या तारखेपासून 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो, याशिवाय गुंतवणूक काढून घेण्यासाठी कुठलाही निर्बंध नसतो.

गुंतवणूकदारांनी त्यांच्या गुंतवणुकीवर लागू पडणारा निर्गमन भार नक्कीच लक्षात घ्यावा. जर लागू पडत असेल, तर निर्गमन भार गुंतवणुकीच्या विक्रीच्या वेळी त्यातून कमी केला जातो. मालमत्ता व्यवस्थापन कंपनी AMC साधारणपणे अल्पकालीन किंवा सट्टेबाजी करणाऱ्या गुंतवणूकदारांना एखाद्या स्किम पासून दूर ठेवण्यासाठी निर्गमन भार लागू करतात.

क्लोज्ड एंड स्किममध्ये असे नसते, कारण स्किमची मुदत पूर्ण होण्याच्या तारखेला सर्व युनिटची आपोआप विक्री केली जाते. असे असताना सुद्धा, क्लोज्ड एंड स्किमचे युनिट्स स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट केलेले असतात, आणि गुंतवणूकदार आपल्या युनिट्सना फक्त एक्सचेंजच्या माध्यमाने विकू शकतात.

म्युच्युअल फंड भारतातील सर्वात लिक्विड गुंतवणुकी आहेत आणि प्रत्येक वित्तीय योजनेसाठी एक आदर्श अ‍ॅसेट क्लास आहेत.

458
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे