विशिष्ट कालावधीसाठी गुंतवणूक करण्याची सोय असलेले फंड्स उपलब्ध आहेत का ?

विशिष्ट कालावधीसाठी गुंतवणूक करण्याची सोय असलेले फंड्स उपलब्ध आहेत का ? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

कुठल्याही म्युच्युअल फ़ंड स्किमचासर्वात मोठा फायदा म्हणजे त्याची लिक्विडिटी, म्हणजेच गुंतवणूकीमधून पैसे सहज काढून घेण्याची सोय.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम (ईएलएसएस), ज्यांत गुंतवणूक केल्याने कलम 80-सी अंतर्गत मिळकत करामध्ये सूट मिळते, त्यांत नियमाप्रमाणे 3 वर्षांचा 'लॉक-इन’ कालावधी असतो आणि त्या नंतरच आपण त्यातून पैसे काढू शकता.

अजून एका प्रकारची स्किम असते जिला "फिक्स मॅच्युरिटी प्लॅन’ (एफएमपी) असे म्हटले जाते ज्यात गुंतवणूकदारांना एका विशिष्ट कालावधीसाठी गुंतवणूक करणे गरजेचे असते, हा कालावधी स्किमच्या दस्तऐवजांत स्पष्ट केलेला असतो. अशा स्किम्सचा कालावधी तीन महिने ते काही वर्षे असू शकतो.

तरीही, काही ओपन एन्ड स्किममध्ये निर्गमन भाराचा कालावधी सांगितलेला असू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या स्किममध्ये असे सांगितलेले असू शकते की 6 महिन्याच्या आत युनिट्सची विक्री केलीत तर त्यावर लागू पडणाऱ्या एनएव्हीवर 0.50% निर्गमन भार आकारला जाईल.

कमीतकमी कालमर्यादेसंबंधी काही विशिष्ट नियम आणि नियमावली असू शकते हे लक्षात घेणे आवश्यक असते. यासाठी वित्त सल्लागाराची मदत घेणे सर्वात हितकारक ठरते, ज्यामुळे प्रत्येक योजनेची अचूक व्याप्ती समजून घेणे सोपे होते. 

457
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे