म्युच्युअल फंड युनिट्सची भरपाई करून घेताना कोणते खर्च करावे लागतात?

म्युच्युअल फंड युनिट्सची भरपाई करून घेताना कोणते खर्च करावे लागतात? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

ओपन ऐनडेड म्युच्युअल फंड्स एका विशिष्ट कालावधीनंतर आपल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या युनिट्सची विनामूल्य विक्री करू देतात. या विशिष्ट कालावधीच्या आधी जर गुंतवणूकदारांना त्यांच्या युनिट्सची विक्री करायची असेल, तर निर्गमन भार आकारला जातो. जर गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक एका विशिष्ट कालावधीच्या आधी काढून घेतली, तर म्युच्युअल फंड कडून हा निर्गनम भार आकारला जातो. हा निर्गमन भार अशा अल्पकालीन उद्दिष्टे असणाऱ्या गुंतवणूकदारांना परावृत्त करण्यासाठी आहे जे दीर्घकालीन गुंतवणुकीची गरज असलेल्या फंड्स मध्ये गुंतवणूक करतात. लिक्विड फंड वर साधारणपणे निर्गमन भार नसतो.

जर विशिष्ट कालावधीच्या आधी युनिट्सची विक्री केली, तर हा निर्गमन भार एनएव्हीच्या टक्केवारी प्रमाणे आकारला जातो, याची माहिती स्किमच्या माहिती दस्तऐवजांमध्ये दिलेली असते. समजा, एखाद्या स्किम मध्ये एक वर्षाच्या आत विक्री केल्यावर 1% निर्गमन भार आकारला जातो. जर त्या स्किमचा एनएव्ही रु. 100 असेल आणि आपण आपले युनिट्स एक वर्ष पूर्ण होण्याआधी विकले, तर आपल्याला दर युनिट मागे फक्त रु. 99 मिळताल कारण फंड कंपनी वेळेआधी भरपाई केली म्हणून 1% निर्गमन भार आकारेल.

त्याच बरोबर आपल्याला आपण केलेल्या गुंतवणुकीचा प्रकार आणि ती गुंतवणूक किती कालावधीसाठी केली होती यानुसार, म्हणजेच अल्पकालीन किंवा दीर्घकालीन कॅपिटल गेन टॅक्स देखील भरावा लागेल. इक्विटी फंडमधील व्यवहारांवर एसटीटी देखील आकारला जातो (सिक्युरिटीज ट्रांझॅक्शन टॅक्स). जेव्हा आपण या फंड मधून युनिट खरेदी करता किंवा विकता, त्या दर वेळी आपल्याला एसटीटी द्यावा लागतो ज्यामुळे आपल्या व्यवहारावरील खर्च वाढतो.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे