निर्गमन भार असलेल्या फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे काही फायदे आहेत का?

निर्गमन भार असलेल्या फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे काही फायदे आहेत का?

म्युच्युअल फंड सही आहे?

बॅलंस फंडबद्दल विचार करूया, ज्यातील इक्विटीचा भाग भांडवलाच्या वाढीसाठी असतो, आणि डेब्टचा भाग मिळकत आणि स्थिरतेसाठी असतो. अशा स्किममध्ये बरीच जोखीम असते, कारण ह्यामध्ये इक्विटीचा भाग जास्तीत जास्त 60% पर्यंत असू शकतो. याची शिफारस फक्त अशा गुंतवणूकदारांसाठी केली जाते ज्यांना अधिक जोखीम पत्करणे आवडते आणि ज्यांचा कालावधी बराच मोठा असतो.

अशा स्किमच्या फंड व्यवस्थापन टीमला फक्त दीर्घकालीन गुंतवणूकदार पाहिजे असतात जे अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करण्याच्या त्यांच्या विश्वासाप्रमाणे वागतील, म्हणजे किमान 3 वर्षे. त्यामुळे अशा फंडमध्ये 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीमध्ये विक्री केल्यास त्यावर 1% निर्गमन भार आकारला जातो. अशाने फंड सरळ-सरळ रोख पैसे देण्यास मनाई करत नाही, पण गुंतवणूकदारांना 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करण्यापासून परावृत्त करीत असतो.

या स्किमला या गोष्टीचा फायदा मिळतो की सर्व गुंतवणूकदार दीर्घकाळासाठी गुंतवणूक करतील. ही बाब फंड व्यवस्थापकासाठी चांगली असते, कारण अशाने ते असे रोखे निवडू शकतात जे दीर्घकालामध्ये चांगला परतावा देतील. फंड व्यवस्थापकाच्या दृष्टीने अशामुळे फंडाचे प्रदर्शन सुधारते, कारण त्यात अल्पकालीन गुंतवणूकदार आणि विक्रीची शक्यता कमी असते ज्याचा दीर्घकालीन डावपेचांवर परिणाम होतो.

458
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे