दीर्घ मुदत म्हणजे कमी जोखीम होऊ शकते का?

दीर्घ मुदत म्हणजे कमी जोखीम होऊ शकते का? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य कालावधीची गरज असते. योग्य कालावधी असल्याने गुंतवणुकीपासून अपेक्षित परतावा मिळण्याची अधिक शक्यता असते, एवढेच नाही तर गुंतवणुकीतील जोखीमसुद्धा कमी होते.

मग, "जोखीम” म्हणजे नक्की काय? सोप्या शब्दांत, याचा अर्थ गुंतवणुकीच्या परताव्यातील अस्थिरता, तसेच गुंतवलेले भांडवल कमी होण्याची शक्यता असा आहे. दिर्घकालासाठी गुंतवणूक कायम ठेवल्याने, कमी/ ऋणात्मक परताव्याची काही वर्षे आणि अपेक्षेपेक्षा अधिक परताव्याची काही वर्षे ह्यांच्या सरासरीनुसार मिळणारा परतावा बऱ्यापैकी असतो. त्यामुळेच, गुंतवणूकदार 'प्रत्येक वर्षाच्या अस्थिर परताव्याच्या सरासरी मुळे’ दिर्घकालामध्ये अधिक स्थिर परतावा मिळवू शकतात.

शिफारस केलेला कालावधी हा म्युच्युअल फंडचा प्रकार आणि अ‍ॅसेट क्लास या नुसार निराळा असतो. कृपया यासंबंधी योग्य वित्त तज्ञाची अथवा सल्लागाराची मदत घेणे आणि गुंतवणुकीसंदर्भात निर्णय घेण्याअगोदर संपूर्ण योजनेसंबंधी दस्तऐवज वाचणे हितकारक ठरेल. 

454
475
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे