एसआयपी आणि म्युच्युअल फंड यामध्ये काय फरक आहे?

एसआयपी आणि म्युच्युअल फंड यामध्ये काय फरक आहे? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

विश्लेषण: म्युच्युअल फंड आणि एसआयपी

म्युच्युअल फंड हे एक आर्थिक उत्पादन आहे, तर एसआयपी हा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा तुम्ही एसआयपी पद्धत निवडता तेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड स्कीममध्येच गुंतवणूक करत असता.

म्युच्युअल फंड्स आणि एसआयपींमध्ये गुंतवणूक केल्यास तुमचे आर्थिक भवितव्य सुरक्षित कसे होऊ शकते हे जाणून घेऊया

म्युच्युअल फंड म्हणजे काय?

म्युच्युअल फंडामध्ये अनेक गुंतवणूकदार शेअर्स, बाँड्स आणि इतर सिक्युरिटीजसारख्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांचे पैसे गोळा करतात. अनुभवी फंड मॅनेजर्स त्या पैशांची काळजी घेतात. मात्र, हे व्यावसायिक व्यवस्थापन आणि कौशल्य संबंधित खर्चासह येते. हे शुल्क सामान्यतः फंडाद्वारे व्यवस्थापित केलेल्या एकूण मालमत्तेच्या अगदी लहान टक्के असते आणि ते फंडाच्या परताव्यातून वजा केले जाते. एक गुंतवणूकदार म्हणून, तुमच्याकडे फंडाच्या एकूण मालमत्तेच्या काही भागाचे प्रतिनिधित्व करणार्‍या युनिट्सची मालकी असते. मूलभूत सिक्युरिटीजच्या बाजारातील कामगिरीच्या आधारे या युनिट्सचे निव्वळ मालमत्ता मूल्य बदलते.


म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय असतात:


1. एकरकमी पद्धत: जेव्हाही तुमच्याकडे जास्तीची रोख रक्कम असते, तेव्हा तुम्ही ती ओपन-एंडेड म्युच्युअल फंड स्कीममध्ये गुंतवू शकता. तुम्ही किती गुंतवणूक करू शकता यावर कोणतेही बंधन नाही. एकरकमी गुंतवणुकीसाठी किमान रक्कम सहसा रु. 500 पासून सुरू होते.


2. एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स): एसआयपीच्या माध्यमातून तुमच्याकडे अगदी कमी म्हणजे रु. 100 पासून नियमित रक्कम गुंतवण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला त्या विशिष्ट तारखांना म्युच्युअल फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य (नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू  - एनएव्ही) जेवढे असेल त्या समतुल्य युनिट्सचे वाटप केले जाईल. एनएव्ही म्हणजे एखाद्या विशिष्ट तारखेला म्युच्युअल फंडाच्या एका युनिटचे बाजारमूल्य होय.


एसआयपींच्या माध्यमातून गुंतवणूक का करावी?

  
1.रुपयाच्या खर्चाची सरासरी साधणे

तुम्ही नियमित अंतराने निश्चित रकमेचे म्युच्युअल फंड युनिट्स खरेदी करता, बाजार पडलेला असताना जास्त खरेदी करता आणि जेव्हा तो वर असतो तेव्हा कमी खरेदी करता, म्हणजे तुमच्या गुंतवणुकीच्या खर्चाची सरासरी साधली जाते. याला म्हणतात रुपयाच्या खर्चाची सरासरी साधणे.

2.छोटी सुरुवात करा
तुम्ही कितीही गुंतवणूक करू शकत असलात तरीही एसआयपी सर्वांना सहजपणे उपलब्ध आहेत. तुम्ही महिन्याला कमीतकमी अगदी 500 रुपयांपासून सुरुवात करू शकता आणि तरीही कालांतराने उत्तम परतावा मिळवू शकता. म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीची किमान रक्कम प्रत्येक स्कीममध्ये वेगवेगळी असते.

3.लवचिकता आणि नियंत्रण
एसआयपीमध्ये तुमच्या आर्थिक परिस्थितीशी जुळणारी गुंतवणुकीची रक्कम आणि पुनरावृत्ती निवडण्याची सवलत असते. तुम्ही गुंतवणुकीचे योगदान वाढवू शकता, कमी करू शकता, तात्पुरते किंवा कायमचे थांबवू शकता.

4.चक्रवाढीची शक्ती
तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक कायम ठेवल्यास, बाजारातील जोखमीच्या अधीन राहून तुम्हाला चक्रवाढीच्या शक्तीचा फायदा मिळून तुमचे पैसे अनेक पटींनी वाढतात.

5.शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय
एसआयपीमुळे तुमच्यामध्ये शिस्तबद्ध गुंतवणुकीचा दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. तुम्ही वेगवेगळ्या आर्थिक उद्दिष्टांसाठी एकाहून अधिक एसआयपी निश्चित करू शकता आणि ती उद्दिष्टे साध्य करू शकता.

म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचे मार्ग


थेट (डायरेक्ट) गुंतवणूक: तुम्ही म्युच्युअल फंड कंपनीच्या माध्यमातून थेट गुंतवणूक करता. याचा अर्थ तुम्ही फंड निवडण्यापासून ते गुंतवणूक करण्यापर्यंत संपूर्ण गुंतवणूक प्रक्रियेची जबाबदारी स्वतः स्वीकारता. यात कोणीही मध्यस्थ सामील नसल्यामुळे याचे शुल्क बऱ्याचदा कमी असते.


वितरक गुंतवणूक: तुम्ही वितरकामार्फत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यास, तुम्ही आर्थिक सल्लागार किंवा ब्रोकर सारख्या मध्यस्थाबरोबर काम करता. ते तुम्हाला योग्य फंड्स निवडण्यासाठी आणि तांत्रिक गोष्टी व्यवस्थापित करण्यासाठी मार्गदर्शन करतात. मात्र, या पर्यायात वितरकाच्या सेवांमुळे खर्च वाढू शकतो.

अस्वीकरण:
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

285
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे