कर-बचत करणाऱ्या म्युच्युअल फंडमध्ये कोणी गुंतवणूक करावी?

कर-बचत करणाऱ्या म्युच्युअल फंडमध्ये कोणी गुंतवणूक करावी? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

कर-लाभ देणारे म्युच्युअल फंड किंवा इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम असे डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड असतात जे आपल्याला मिळकत कर कायद्याच्या कलम 80C प्रमाणे कर-लाभ देतात. त्यामुळे, ELSS फंड अशा करदात्यांसाठी योग्य आहेत जे कर-बचत करण्यासाठी इक्विटी-ओरिएंटेड साधनांचा वापर करण्याची जोखीम पत्करण्यास तयार आहेत. ELSS फंड पगारदार वर्गासाठी अधिक योग्य आहेत कारण अशा लोकांकडे मिळकतीचा एक नियमित स्रोत असतो आणि त्यांना दर वर्षी कर-बचत करावी लागते. खरे तर, असे लोक दर महिन्याला SIP च्या माध्यमाने ELSS मध्ये सोप्या रीतिने गुंतवणूक करू शकतात ज्याने त्यांना रुपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंगचा फायदा मिळतो.

जर आपण तरुण करदाते असलात, तर आपण ELSS मध्ये गुंतवणूक करण्याचा दुहेरी फायदे घेऊ शकता, म्हणजेच ELSS मध्ये गुतंवणूक करून कलम 80C अन्वये कर-लाभ घ्या आणि दीर्घकाळामध्ये इक्विटीच्या वाढीच्या शक्यतेचा फायदासुद्धा घ्या. वयस्कर करदाते सुद्धा ELSS मध्ये गुंतवणूक करून कर-लाभ घेऊ शकतात, तरीही  ELSS मध्ये इक्विटीची जोखीम असल्यामुळे त्यासाठी अधिक मोठा कालावधी असणे गरजेचे असते जो वयस्कर लोकांकडे असेलच असे नाही.

लक्षात ठेवा, ELSS फंडमधील गुंतवणूक 3 वर्षांसाठी काढता येत नाही. जर आपण एकरकमी गुंतवणूक केलीत, तर आपण 3 वषे पूर्ण झाल्यावरच पैसे काढू शकाल. हा लॉक-इन कालावधी प्रत्येक SIP साठी सुद्धा लागू आहे. जर आपल्याला 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये गुंतवलेली संपूर्ण रक्कम काढून घ्यायची असेल, तर आपल्या शेवटल्या SIP च्या हप्त्याला 3 वर्षे पूर्ण होई पर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. पण फक्त फंडमध्ये लॉक-इन कालावधीसाठी गुंतवणूक करणेच महत्त्वाचे नाही, तर त्यानंतरसुद्धा आपली गुंतवणूक सुरू ठेवणे गरजेचे आहे, तरच आपल्याला ELSS च्या खऱ्या वाढीचा प्रत्यय येईल.


रिटायरमेंटच्या जवळ आलेल्या करदात्यापेक्षा, काही दशके पुढे काम करणार आहेत अशा एखाद्या तरुण करदात्यासाठी ELSS  चा दुहेरी फायदा घेणे अधिक सोपे आहे. तरीही, रिटायरमेंटला 5-7 वर्षे उरलेली असताना सुद्धा जर अशी जोखीम पत्करणे आपल्याला पटत असेल, तर आपण ELSS चा विचार करू शकता. अशा प्रकारे, आपल्या वयाप्रमाणे, जोखीम पत्करण्याच्या इच्छेप्रमाणे आणि गृहकर्ज किंवा शिक्षण कर्जांसारख्या इतर जबाबदाऱ्या ध्यानात घेता, आपण कर-बचत करण्यासाठी ELSS चा वापर करू शकता आणि जुन्या कर-नियमांचा फायदा घेऊ शकता.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे