म्युच्युअल फंड्ससाठी टॅक्स (कर) संबंधी नियम आणि तरतुदी काय आहेत?

म्युच्युअल फंड्ससाठी टॅक्स (कर) संबंधी नियम आणि तरतुदी काय आहेत? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकींवर कॅपिटल गेन टॅक्स आकारला जातो. जेव्हा आपण म्युच्युअल फंडाच्या युनिट विकता/ काढून घेता तेव्हा आपल्याला झालेल्या नफ्यावर हा कर आकारला जातो. हा नफा म्हणजे विकलेल्या दिवशीचे स्किमचे नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू (एनएव्ही) आणि खरेदी केलेल्या दिवशीचे एनएव्ही यांतील फरक होय (विक्रीची किंमत - खरेदीची किंमत). कॅपिटल गेन टॅक्सचे गुंतवणुकीच्या कालावधीप्रमाणे विभाजन केले जाते. इक्विटी फंड्ससाठी (ज्या फंड्समध्ये इक्विटीचा वाटा >=65% असतो), त्यांच्यासाठी एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीला दीर्घकाल म्हटले जाते आणि त्यावर दीर्घकालीन कॅपिटल गेन टॅक्स (एलटीसीजी) आकारला जातो. 

जर एका वित्तीय वर्षामध्ये एकूण कॅपिटल गेन रु. 1 लाखापेक्षा अधिक असले तर इक्विटी फंडवर 10% एलटीसीजी आकारला जातो. आर्थिक नियोजन करताना लक्षात ठेवा की रु. 1 लाखांपर्यंत तुमचा लाभ कर-मुक्त असतो. हा कर 31 जानेवारी 2018च्या नंतर केलेल्या सर्व गुंतवणुकींसाठी लागू आहे. इक्विटी फंडमधील एका वर्षापेक्षा कमी कालावधीच्या गुंतवणुकीवरील नफा 15% शॉर्ट-टर्म कॅपिटल गेन टॅक्स (एसटीसीजी)च्या अधीन आहे.

इक्विटी-इतर फंड (डेब्ट फंड) मधील 3 वर्षे किंवा अधिक कालावधीच्या गुंतवणुकीला दीर्घकालीन म्हटले जाते आणि अशा गुंतवणुकीवरील नफ्यावर 20% एलटीसीजी टॅक्स आकारला जातो आणि यात इंडेक्सेशनची सोय असते, याचा अर्थ असा की कॅपिटल गेनची गणना करताना खरेदी किमतीला चलनवाढीसाठी एक विशिष्ट दराने वाढवून दाखवले जाते. तीन वर्षांपेक्षा कमी गुंतवणुकीवरील नफा एसटीसीजी टॅक्सच्या अधीन आहे, त्याचा दर गुंतवणूकदाराच्या मिळकत कराच्या सर्वात अधिक स्लॅबप्रमाणे असतो.

459
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे