डेब्ट फंड आपला पैसे कुठे गुंतवतात?

डेब्ट फंड आपला पैसे कुठे गुंतवतात? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

गुंतवणूकदारांकडून एकत्र केलेला पैसा घेऊन डेब्ट फंड त्याला बँका, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक वित्तीय संस्था, कॉर्पोरेट आणि सरकार यांनी जारी केलेल्या बाँड्समध्ये गुंतवतात. हे बाँड्स बहुधा मध्यम ते दिर्घकालीन स्वरुपाचे असतात. जेव्हा एखादा म्युच्युअल फंड अशा बाँड्समध्ये गुंतवणूक करतो, तेव्हा या बाँड्सकडून ठराविक कालावधीने व्याज मिळते, ज्याचे फंडाचा एकूण परताव्यामध्ये योगदान असते. 

काही डेब्ट फंड्स सरकारने जारी केलेले टी-बिल्स, कमर्शिअल पेपर्स, डिपॉझिट सर्टिफिकेट बँकर्स अ‍ॅक्सेप्टंस, बिल्स ऑफ एक्सचेंज इत्यादींसारख्या मनी मार्केट इंस्ट्रूमेंट मध्ये गुंतवणूक करतात, ज्याचे स्वरुप अधिक अल्पकालीन गुंतवणुकीचे असते. हे उपकरणेसुद्धा नियमित कालावधीने स्थिर व्याज देण्याचे वचन देतात, ज्याचे फंडाच्या एकूण परताव्यामध्ये योगदान असते. 

जरी बाँड्स आणि रोखे बाजारातील उपकरणे दोघांनी ही त्यांच्या गुंतवणूकदारांना वचन दिलेले असले की,आपला म्युच्युअल फंड भविष्यात नियमित कालावधीने व्याज देईल. तरीही आर्थिकसंकटासारख्या काही परिस्थितींमध्ये असे होऊ शकते की ते हे वचन पूर्ण करू शकणार नाहीत. म्हणूनच, इक्विटी फंड्सपेक्षा डेब्ट फंड्स अधिक स्थिर समजले जातात, तरीही त्यांत काही प्रमाणात जोखीम तर असतेच, कारण बॉंड्स जारी करणाऱ्या संस्था वेळेवर पैसे देण्यास अयशस्वी ठरू शकतात, ज्यात त्या फंडच्या एकूण परताव्याचा बराचसा हिस्सा असतो.

460
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे