म्युच्युअल फंड स्किमच्या माध्यमातून अ‍ॅसेट क्लासेज मध्ये गुंतवणूक करता येते का?

म्युच्युअल फंड स्किमच्या माध्यमातून अ‍ॅसेट क्लासेज मध्ये गुंतवणूक करता येते का?

म्युच्युअल फंड सही आहे?

अ‍ॅसेटच्या एकाच प्रकारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंड स्किम्स ह्या तज्ज्ञ फलदांज किंवा गोलंदाजासारख्या असतात. तर काही इतर स्किम, ज्यांना हायब्रिड फंड म्हटले जाते, अ‍ॅसेटच्या एकापेक्षा अधिक प्रकारांमध्ये गुंतवणूक करतात, उदाहरणार्थ काही इक्विटी आणि डेब्ट दोन्हीमध्ये गुंतवणूक करतात. काही स्किम इक्विटी आणि डेब्ट यांसोबतच सोन्यात सुद्धा गुंतवणूक करतात.

आपण क्रिकेटमध्ये पाहतोच, की काही फलदांजी करणारे तसेच काही गोलंदाजी करणारे खेळाडू अष्टपैलू असतात, – हे त्यांच्या कौशल्यावर हे अवलंबून असते. तसेच अशा काही म्युच्युअल फंड स्किम्स असतात ज्या अ‍ॅसेटच्या इतर प्रकारांपेक्षा एकाच प्रकारामध्ये अधिक प्रमाणात गुंतवणूक करतात.

सर्वात जुना प्रकार म्हणजे, बॅलंस फंडचा प्रकार, ज्यात इक्विटी आणि डेब्ट दोन्हीमध्ये गुंतवणूक केली जाते. यात इक्विटीचा भाग साधारणपणे अधिक असतो (65% पेक्षा अधिक) आणि उरलेली गुंतवणूक डेब्ट मध्ये असते.

इतर लोकप्रिय प्रकार आहे एमआयपी किंवा मासिक मिळकत प्लॅन, ज्यात गुंतवणूकदारांना मासिक (किंवा नियमित) मिळकत देण्याचा प्रयत्न केला जातो. पण, यात नियमित मिळकतीची हमी दिली जात नाही. या स्किमचा बहुतांश भाग डेब्ट सिक्युरीटीजमध्ये गुतंवलेला असतो त्यामुळे नियमित मिळकत दिली जाऊ शकते. याचा लहानसा भाग इक्विटीमध्ये गुंतवला जातो ज्याने काही वर्षांमध्ये परतावा वाढण्याची शक्यता असते. 

हायब्रिड स्किम्सचा आणखी एक प्रकार हा इक्विटी, डेब्ट आणि सोने यांच्यात गुंतवणूक करतो ज्याने एकाच पोर्टफोलिओ मध्ये मालमत्तेच्या तीन निरनिराळ्या प्रकारांचा फायदा घेतला मिळू शकतो.

गुंतवणूकदारांकडे पर्याय असतो की ते इक्विटी किंवा डेब्ट किंवा सोन्याच्या निरनिराळ्या स्किम्स खरेदी करू शकतात ज्याने एक हायब्रिड पोर्टफोलिओ निर्माण होईल, किंवा ते सरळ हायब्रिड फंड खरेदी करू शकतात.

453
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे