भारतात म्युच्युअल फंड्सचा प्रसार कसा झालेला आहे?

भारतात म्युच्युअल फंड्सचा प्रसार कसा झालेला आहे? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

1964 मध्ये सुरू झाल्यापासून, म्युच्युअल फंड आज 17.37 लाख कोटींच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करीत आहेत (31 जानेवारी 2017 चा आकडा).

ही लक्षणीय वाढ, भारताच्या सबळ अर्थकारणामुळे, अधिक चांगल्या नियमनामुळे, प्रतिष्ठित भारतीय आणि परदेशी अ‍ॅसेट मॅनेजर्सच्या शिरकाव्यामुळे आणि भारतीय गुंतवणूकदारांमध्ये अ‍ॅसेटचा आवडता प्रकार म्हणून म्युच्युअल फंड्सची वाढत असलेली मागणी ह्यामुळे झाली आहे.

या ठिकाणी हे नमूद करणे योग्य ठरेल की प्रत्येक स्वतंत्र किरकोळ गुंतवणूकदाराच्या खात्यामध्ये सरासरी गुंतवणूक ₹ 68,086 एवढी आहे, ह्यावरून हे स्पष्ट होते की भारतीय मध्यम वर्ग अ‍ॅसेटचा हा प्रकार स्विकारत आहे.

भारतामध्ये आज 42 अ‍ॅसेट मेनेजमेंट कंपनी (एएमसी) आहेत ज्या अधिकाधिक महत्त्वाकांक्षी देशामध्ये वित्तीय नियोजन आणि म्युच्युअल फंड्सचा संदेश पसरवण्यासाठी आणि जागरूकता वाढवण्यासाठी झटत आहेत.

एसआयपीच्या माध्यमातून आज जवळ-जवळ 4,000 कोटी रुपये दर महिन्याला गुंतवले जात आहेत, हे एक आज म्युच्युअल फंड्स भारतात किती विश्वासनीय आणि लोकप्रिय आहेत ह्याचे प्रतिक आहे.

भारतातील सर्वोच्च 15 शहरांमध्ये म्युच्युअल फंडची 83% मालमत्ता आहे. म्युच्युअल फंड्सबद्दल जागरूकता आणि स्विकार्ह्यता वाढविण्यासाठी उद्योगजगताकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत जेणेकरून म्युच्युअल फंड्स लहान शहरांत आणि गावांत सुद्धा पोहचतील.

(सर्व माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युल फंड्स ऑफ इंडिया कडून).

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे