अनिवासी भारतीय भारतामध्ये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करु शकतात का?

अनिवासी भारतीय भारतामध्ये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करु शकतात का?
म्युच्युअल फंड कैलकुलेटर

म्युच्युअल फंड सही आहे?

हो, अनिवासी भारतीय (NRI) आणि भारतीय वंशाच्या व्यक्ती (PIO) हे भारतीय म्युच्युअल फंड मध्ये स्वदेशी तसेच परदेशी तत्वावर गुंतवणूक करू शकतात.

परंतु, अनिवासी भारतीयांना गुंतवणूक करण्याआधी केवायसी सारख्या प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे असू शकते. अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांमध्ये अनिवासी भारतीयांकडून योग्य प्रकटीकरण असल्याशिवाय म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीला बंदी आहे. म्हणूनच ह्या देशातल्या अनिवासी भारतीयांनी भारतीय म्युच्युअल फ़ंड मध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक करण्याआधी एकदा त्यांच्या सल्लागाराबरोबर भारतीय फंड मध्ये गुंतवणूक करण्याच्या व्यवहार्यतेवर चर्चा करणे गरजेचे आहे.

गुंतवणूक करताना अनिवासी भारतीयांना (NRI) भारतीय नागरिकांप्रमाणे फायदे आणि लाभ दिले जातात. ते एसआयपी मधून गुंतवणूक करू शकतात, ते त्यांच्या सोयीनुसार स्किम मधून स्थलांतर करू शकतात, ते ग्रोथ किंवा डिव्हीडंट पर्याय निवडू शकतात आणि त्यांना पाहिजे तेव्हा विक्री करून रक्कम त्यांच्या देशात घेऊन जाऊ शकतात.

अशा प्रकारे अनिवासी भारतीय (NRI) आणि भारतीच्या वंशाचे परदेशी व्यक्ती (PIO) भारतीय म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून त्यांच्या विविध प्रकारच्या फायद्यांचा लाभ घेऊ शकतात.

456
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे