निवृत्त व्यक्तींनी म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करावी का?

निवृत्त व्यक्तींनी म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करावी का? zoom-icon
म्युच्युअल फंड कैलकुलेटर

म्युच्युअल फंड सही आहे?

सामान्यतःनिवृत्त व्यक्तींनी त्यांची बचत आणि गुंतवणूक बरेचदा बँकेतील मुदत ठेवी, पीपीएफ, सोने, स्थावर मालमत्ता, विमा, पेन्शन योजना इ. मध्ये केलेली असते. यापैकी बऱ्याचशा पर्यायांमधून पैसे लगेच रोख रकमेत बदलणे कठीण असते. यामुळे वैद्यकीय किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनावश्यक तणावाला तोंड द्यावे लागू शकते. म्युच्युअल फंड्स निवृत्त व्यक्तींना सर्वात आवश्यक अशी लिक्विडीटी उपलब्ध करून देतात ज्यामुळे यामधून आपले पैसे काढून घेणे अत्यंत त्यांना सोपे होते तसेच कर भरल्यानंतर ह्यातून चांगला परतावाही मिळतो. 

ब-याच बरेच निवृत्त व्यक्तींनाम्युच्युअल फंड्सच्या परताव्यामधील अस्थिरता आणि चढउतारांमुळे भिती वाटते आणि ते त्यांच्यापासून लांबच राहतात. त्यांनी त्यांच्या निवृत्ती निधी मधील काही भाग डेब्ट म्युच्युअल फंड्स मध्येगुंतवला पाहीजे आणि सिस्टिमॅटिक विड्रॉ प्लॅन (SWP) चाही विचार केला पाहीजे. त्यांना अशा गुंतवणुकीमधून नियमित मासिक उत्पन्न मिळण्यास मदत होईल. डेब्ट फंड्स हे इक्विटी फंड्स पेक्षा अधिक सुरक्षित असतात कारण ते बँक, कंपन्या, शासकीय संस्था आणि रोखे बाजार उपकरणांमध्ये(मनी मार्केट इन्स्ट्रुमेन्ट्स म्हणजेच बँक सीडीज, टी-बिल्स, व्यावसायिक कागदपत्रे) गुंतवणूक करतात.

डेब्ट फंड्स मधील एसडब्ल्यूपी बँकेतील मुदत ठेवींच्या तुलनेत करलाभाचे अधिक परतावे देते. एसडब्ल्यूपीमधून रोख रक्कम काढण्याच्या प्रक्रियेशी तुलना करता,मुदत ठेवी/ निवृत्ती योजनांमधील उत्पन्नांवर अधिक प्रभावी कर दर लागू केले जातात. निवृत्तीवेतन योजनेच्या तुलनेत आपण आपल्या गरजेनुसार एखादी एसडब्ल्यूपी सेवा सहज थांबवू शकताकिंवा काढून घेण्याची रक्कम कधीही बदलूही शकता. म्हणूनच, निवृत्त व्यक्तींनी त्यांच्या आर्थिक नियोजनांमध्ये म्युच्युअल फंड्सचा समावेश करायलाच हवा.

458
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे