भारतामध्ये म्युच्युअल फंडांचे नियमन कोण करते?

भारतामध्ये म्युच्युअल फंडांचे नियमन कोण करते? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंड हा आजच्या काळातील पसंतीचा गुंतवणुकीचा पर्याय आहे. त्यामुळे भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाचे नियमन कोण करते, हे जाणून घेणे गरजेचे आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया किंवा सेबी भारतातील म्युच्युअल फंडांच्या सर्व बाबींचे नियमन करते. म्युच्युअल फंड उद्योगात पारदर्शकता, निष्पक्षता आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी तिने कठोर नियम आणि कायदे निश्चित केले आहेत.

सेबीची स्थापना 1988 मध्ये झाली आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया कायदा 1992 अन्वये सेबीला तिचे कायदेशीर अधिकार प्राप्त झाले आहेत. 

म्युच्युअल फंड हा एका ट्रस्टच्या स्वरूपात स्थापन केला जातो, ज्यात प्रायोजक, विश्वस्त, ॲसेट व्यवस्थापन कंपनी (एएमसी) आणि कस्टोडियन असतात. ट्रस्टची स्थापना एका प्रायोजकाद्वारे किंवा एकाहून अधिक प्रायोजकांद्वारे केली जाते जे एखाद्या कंपनीच्या प्रवर्तकासारखे असतात. म्युच्युअल फंडाचे विश्वस्त युनिटधारकांच्या फायद्यासाठी त्याची मालमत्ता ठेवतात/ सांभाळतात. सेबीने मंजूर केलेली एएमसी विविध प्रकारच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करून निधीचे व्यवस्थापन करते. सेबीकडे नोंदणी करणे आवश्यक असलेल्या कस्टोडियनकडे फंडाच्या विविध योजनांचे सिक्युरिटीज असतात. विश्वस्तांना एएमसीचे पर्यवेक्षण आणि संचालन करण्याचे सामान्य अधिकार देण्यात आले आहेत. ते म्युच्युअल फंडाच्या कामगिरीवर आणि सेबीच्या नियमांच्या अनुपालनावर लक्ष ठेवतात. सेबीच्या नियमांनुसार विश्वस्त कंपनीचे किंवा विश्वस्त मंडळाचे किमान दोन तृतीयांश संचालक स्वतंत्र असणे आवश्यक आहे म्हणजेच ते प्रायोजकांशी संबंधित नसावेत. तसेच एएमसीचे 50% संचालक स्वतंत्र असणे आवश्यक आहे.

सेबी विशेषतः खालील गोष्टींसाठी जबाबदार आहे:

नोंदणी आणि मान्यता: म्युच्युअल फंडाची सेबीकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे, तो त्याच्या प्रत्येक योजनेअंतर्गत जनतेकडून निधी गोळा करू शकतो.

गुंतवणूकदाराचे संरक्षण: फसवणूकीची कृत्ये आणि हितसंबंधाचे संघर्ष यामुळे गुंतवणूकदाराचे नुकसान होऊ नये म्हणून सेबीने न्याय्य आणि नैतिक व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत.

प्रकटीकरण आवश्यकता: म्युच्युअल फंडांना सेबीने वेळोवेळी निश्चित केलेल्या विशिष्ट प्रकटीकरण निकषांचे पालन करणे आवश्यक आहे.

आचारसंहिता: म्युच्युअल फंड, फंड मॅनेजर्स आणि म्युच्युअल फंड उद्योगाशी संबंधित इतर महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांसाठी नैतिक वर्तन आणि व्यावसायिक मानदंड सुनिश्चित करण्यासाठी सेबी एक आचारसंहिता तयार करते.

वेळोवेळी पुनरावलोकने आणि अपडेट्स: नियामक आराखडा मजबूत आणि बदलत्या बाजारपेठेच्या परिस्थितीस प्रतिसाद देणारा असेल, हे सेबी सुनिश्चित करते.

सतत निरीक्षण आणि देखरेख: नियामक नियमांचे अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी सेबी म्युच्युअल फंडांचे सतत निरीक्षण आणि देखरेख करते. कोणतेही उल्लंघन झाल्यास तिला सुधारात्मक कारवाई करण्याचे, दंड ठोठावण्याचे किंवा निर्देश जारी करण्याचे अधिकार आहेत.

वरील सर्व कार्ये सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारे यासाठी पार पाडली जातात तिला योग्य वाटेल अशा उपायांद्वारे सिक्युरिटीजमधील गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आणि सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि त्याचे नियमन करण्यासाठी 

अस्वीकरण

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

285
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे