जर एखादी म्युच्युअल फंड कंपनी बंद पडली/विकली गेली तर काय होते?

जर एखादी म्युच्युअल फंड कंपनी बंद पडली/विकली गेली तर काय होते?

म्युच्युअल फंड सही आहे?

जेव्हा एखादी म्युच्युअल फंड कंपनी बंद होते किंवा विकली जाते, तेव्हा तिच्या सद्य गुंतवणूकदारांसाठी ती गंभीर घटना असते. पण, जसे की म्युच्युअल फंड्स हे सेबीच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे, अशा गोष्टींसाठी विहित केलेली प्रक्रिया असते.

जेव्हा म्युच्युअल फंड कंपनी बंद होतेतेव्हा, एकतर फंडच्या विश्वस्तांना सेबीकडे बंद करण्याबाबत मंजुरी मागावी लागते किंवा सेबीच थेट फंड बंद करते. अशा परिस्थितीमध्ये, बंद करण्याआधी, सगळ्या गुंतवणूकदारांना त्यांचे फंड्स शेवटच्या उपलब्ध असलेल्या निव्वळ मालमत्ता मूल्यानुसार(एनएव्ही) परत केले जातात.

जर म्युच्युअल फंडची मालकी दुस-या फंड हाऊस कडे गेली तर दोन पर्याय उपलब्ध होतात. एक, सगळ्या स्किम्स त्याच्या मूळ स्वरुपात चालू राहतील तथापि नवीन फंड हाऊस त्यावर देखरेख करेल. किंवा, नवीन फंड हाऊस मध्ये मूळ स्किम्सचे एकत्रीकरण होईल. मालकीहक्क आणि संपादन तसेच स्किम स्तराच्या मालकीहक्कासाठी सुद्धा, सेबीची मंजुरी ही प्रत्येक अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीसाठी आवश्यक असते.

अशा सगळ्या परिस्थितीमध्ये, गुंतवणूकदारांना कोणताही निर्गमन(एक्झिट लोड) भार न देता स्किम्स मधून बाहेर पडण्याचा पर्याय दिलेला असतो. गुंतवणूकदार किंवा फंड हाऊस ह्यांनी केलेली कोणतीही कृती ही नेहमी चालू असलेल्या निव्वळ मालमत्ता मूल्यानुसार केली जाते.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे