SIP मध्ये 2 वर्षांचा विलंब तुम्हाला किती महागात पडू शकतो

SIP मध्ये 2 वर्षांचा विलंब तुम्हाला किती महागात पडू शकतो zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

शेअर बाजारातील गुंतवणूक भीतीदायक असू शकते, विशेषत: जर तुम्ही नवशिके असाल. तथापि, एक प्रयत्नसिध्द गुंतवणूक धोरण आहे जे केवळ स्टॉक मार्केटमध्येच गुंतवणूक करणे सोपे आणि सुलभ बनवते असे नाही तर दीर्घकालीन संपत्ती तयार करण्यात देखील मदत करू शकते: एसआयपी किंवा सिस्टेमटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स.  

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (एसआयपी) द्वारे तुम्हाला नियमित अंतराने म्युच्युअल फंडांमध्ये थोडीशी रक्कम गुंतवता येते. नियमितपणे थोडे थोडे पैसे गुंतवून, एसआयपी तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चक्रवाढ शक्तीचा वापर करण्यास मदत करू शकतात. 

दर महिन्याला म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवलेल्या थोड्या रकमेमध्ये कालांतराने महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ बनण्याची क्षमता असते. जे गुंतवणुकीसाठी त्रासमुक्त आणि शिस्तबद्ध दृष्टिकोन शोधत आहेत त्यांच्यासाठी एसआयपी हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. प्रॉडक्ट/स्कीमच्या योग्यतेबाबत तुम्हाला काही अनिश्चितता असल्यास, म्युच्युअल फंड तज्ञाकडून मार्गदर्शन घेणे उचित असते.

अनेकदा, लोक एसआयपी किंवा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यापासून दूर राहतात कारण त्यांना वाटते की ते खूप गुंतागुंतीचे आहे. ते कसे कार्य करते याची यंत्रणा समजून घेण्यात त्यांना अडचण येते, म्हणून ते त्यांची गुंतवणूक बंद करतात. 

तथापि, तुमची गुंतवणुक करण्यात उशीर केल्यास मोठा तोटा होऊ शकतो! तुम्ही एसआयपी मध्ये महिन्याला फक्त रु 1,000 गुंतवलेत तरीही, दोन वर्षांचा विलंब तुम्हाला महागात पडू शकतो!  

विश्वास बसत नाही का? चला आकडेवारी पाहूया! 

गृहीत धरू की वयाच्या 25 व्या वर्षी, तुम्हाला इक्विटी एसआयपी मध्ये 1,000 रुपये गुंतवायचे आहेत ज्यामुळे तुम्हाला 30 वर्षे गुंतवणुकीत राहण्याच्या योजनेसह 12% वार्षिक परतावा मिळेल. काही कारणास्तव, तुम्ही दोन वर्षांनी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. तुमचे गुंतवणुकीची कालसीमा नंतर 28 वर्षाची होईल. खालील तक्ता तुम्हाला मिळू शकणाऱ्या संभाव्य परतावा दर्शवते. तरीसुद्धा, हे परतावे जोखमीच्या अधीन आहेत हे मान्य करणे महत्त्वाचे आहे:
 

तपशील

25 व्या वर्षी सुरू

27 व्या वर्षी सुरू

गुंतवणुकीची कालसीमा

30

28

दरमहा गुंतवणूक केलेली रक्कम

Rs 1,000

Rs 1,000

गुंतवणुकीवर गृहीत धरलेला परतावा

12%

12%

गुंतवणूक केलेली रक्कम

Rs 3,60,000

Rs 3,36,000

परताव्यासह जमा झालेला एकूण कॉर्पस

Rs 35,29,914

Rs 27,58,585

विलंब झालेल्या गुंतवणुकीची किंमत

-

Rs 7,71,329

* वरील गणना केवळ उदाहरणादाखल आहेत आणि जोखमीच्या अधीन आहेत.

एवढ्या मोठ्या कालावधीसाठी डेब्ट फंडातील एसआयपी संशयास्पद आहे. हायब्रीड फंडाचा विचार करू शकता
तुम्ही बघू शकता की, फक्त दोन वर्षांचा विलंब तुम्हाला रु. 7 लाखांपेक्षा जास्त तोटा करू शकतो! आता, जरी तुम्ही हायब्रीड फंडात वार्षिक सरासरी 10% रिटर्नसह गुंतवणूक केली असली तरी, तुमच्या विलंबामुळे झालेली गुंतवणुकीची किंमत लाखांमध्ये असली असती. 
 

तपशील

25 व्या वर्षी सुरू

27 व्या वर्षी सुरू

गुंतवणुकीची कालसीमा

30

28

दरमहा गुंतवणूक केलेली रक्कम

Rs 1,000

Rs 1,000

गुंतवणुकीवर गृहीत धरलेला परतावा

10%

10%

गुंतवणूक केलेली रक्कम

Rs 3,60,000

Rs 3,36,000

परताव्यासह जमा झालेला एकूण कॉर्पस

Rs 22,79,325

Rs 18,45,849

विलंब झालेल्या गुंतवणुकीची किंमत

-

Rs 4,33,476

* वरील गणना केवळ उदाहरणादाखल आहेत आणि जोखमीच्या अधीन आहेत.

चक्रवाढीची शक्ती

चक्रवाढ शक्ती ही गुंतवणुकीतील एक शक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या मुख्य गुंतवणुकीवर तसेच जमा झालेल्या व्याजावर व्याज मिळवू देते. याचा अर्थ असा की तुमच्या कमाईमध्ये कालांतराने चढत्या दराने वाढ होण्याची क्षमता असेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर लक्षणीय परतावा मिळू शकेल.

तुम्ही गुंतवणुकीला लवकर सुरवात केल्यास तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने मिळणाऱ्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात फरक पडतो आणि तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे सहज पूर्ण करू शकता. वर दिलेल्या उदाहरणा मधून हे स्पष्ट होते की फक्त दोन वर्षांचा विलंब किती महागात पडू शकतो.

म्हणूनच तुम्ही शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू केली पाहिजे. तुमच्याकडे महिन्याला गुंतवणुकीसाठी फक्त 1,000 रुपये असले तरीही, तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगला म्युच्युअल फंड शोधावा.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे आणि त्रासमुक्त आहे. मासिक गुंतवणूक करण्याची चिंता न करता तुम्ही तुमची ऑनलाइन गुंतवणूक स्वयंचलित करू शकता.

अंतिम शब्द

तुम्हाला माहिती आहेच, हळू पण चिकाटीने जाणारा शर्यत जिंकतो. जरी तुम्ही थोडीशीच गुंतवणूक करू शकत असलात तरी भविष्यात आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होण्यासाठी आजच सुरुवात करा.

अस्वीकरण

एएमएफआय म्युच्युअल फंड योजनांच्या विविध प्रवर्गांबद्दलची वेबसाइटवर वितरित माहिती देण्याच्या हेतुकरिता, म्युच्युअल फंड्सविषयी एक वित्तीय उत्पादन प्रवर्ग म्हणून जागृती निर्माण करण्यासाठी आहे आणि कोणत्याही विक्री प्रचारासाठी नाही किंवा व्यवसायाच्या शिफारससाठी नाही. 

येथे दिलेला मजकूर एएमएफआय द्वारे जाहीररीत्या उपलब्ध माहितीच्या, अंतर्गत स्रोतांच्या आणि इतर त्रयस्थ स्रोतांच्या आधारे तयार करण्यात आला असून विश्वसनीय मानला जातो. परंतु, अशा माहितीच्या अचूकतेविषयी एएमएफआय हमी देऊ शकत नाही, तिच्या पूर्णत्वाविषयी आश्वासन देऊ शकत नाही किंवा ही माहिती बदलणार नाही असे वचन देऊ शकत नाही. 

सदर मजकूर वैयक्तिक गुंतवणूकदाराची उद्दिष्टे, जोखीम पत्करण्याची क्षमता किंवा आर्थिक गरजा किंवा परिस्थिती किंवा येथे वर्णिलेल्या म्युच्युअल फंड उत्पादनांची अनुकूलता विचारात घेत नाही. म्हणूनच, गुंतवणूकदारांना आम्ही सल्ला देतो की त्यांनी त्यांच्या व्यावसायिक गुंतवणूकदार सल्लागारांचा / समुपदेशकांचा / कर सल्लागारांचा ह्या संदर्भात गुंतवणुकीसाठीचा सल्ला घ्यावा. 

म्युच्युअल फंड योजना ही ठेव योजना नसते आणि म्युच्युअल फंडद्वारे किंवा त्याच्या एएमसीद्वारे तशा बंधनकृत, हमीकृत किंवा विमेकृत नसते. त्यामध्ये अंतर्भूत गुंतवणुकांच्या स्वरूपामुळे, म्युच्युअल फंडमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची किंवा संभाव्य उत्पन्नाची हमी देता येत नाही. ऐतिहासिक कामगिरी जेव्हा सादर होते तेव्हा ती फक्त संदर्भाच्या हेतुकरिता असते आणि भावी परिणामांची हमी नसते.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

 

286
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे