फार उतर-चढ होत असलेल्या मार्केटमध्ये आपला एसआयपी प्लॅन सुरू का ठेवावा?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

जेव्हा मार्केटमध्ये फार अधिक चढ-उतर होत असते तेव्हा अनेक गुंतवणूकदारांना अशी शंका येते की गुंतवणूक करण्याचा त्यांचा निर्णय योग्य होता की नाही, आणि ते एसआयपी थांबवण्याचा किंवा पैसे काढून घेण्याचा विचार करू लागतात. अशा अस्थिर बाजारात आपली गुंतवणूक नुकसान दाखवत असताना काळजी वाटणे साहजिकच आहे. पण विशेष करून मार्केट खाली जात असताना एसआयपी सुरू ठेवणे शहाणपणाचे लक्षण आहे कारण अशा वेळेला आपल्याला तेवढ्याच रकमेच्या बदल्यात अधिक यूनिट मिळतात. आपल्याला सर्वांनाच स्वस्त वस्तू खरेदी करायला आवडते, मग ते ऑनलाइन सेल असो किंवा भाजीवाल्याकडे असो. हो ना? तर भाव कमी होत असताना आपण म्युच्युअल फंडच्या बाबतीत तसे का करू नये?

मार्केटबद्दल भाकीत करणे तर हवामानाचा अंदाज बांधण्यापेक्षा सुद्धा अधिक कठीण आहे. आपण एकरकमी गुंतवणूक करण्यासाठी मार्केट पडण्याची योग्य वेळ ठरवून तसे करू शकत नाही. आपण गुंतवणूक केल्या नंतर जर मार्केट आणखी पडले तर? तसेच, आपण मार्केट फार वर गेल्यावर विकण्याचा निर्णय घेतला तरीही आपण विकल्या नंतर मार्केट आणखी वर जाऊ शकतेच. जर आपण मार्केटचा असा फायदा घेण्याचा प्रयत्न केलात, तर आपल्याला फार निराशा होईल आणि चुकीच्या टायमिंगमुळे आपल्या परताव्यावर सुद्धा प्रभाव पडू शकतो. आपल्या उद्दिष्टांकडे नीट लक्ष ठेवून एसआयपीच्या माध्यमाने मार्केटच्या चढ-उताराच्या दरम्यान नियमितपणे गुंतवणूक करत राहणे योग्य आहे. मार्केटच्या चढ-उताराची काळजी आपण करण्याची गरज नसते कारण दीर्घ काळामध्ये आपल्या गुंतवणुकीच्या खर्चाची सरासरी आपल्या बाजूनेच होते. 

454
475
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे