मला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी सुरू करता येईल?

मला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी सुरू करता येईल?
म्युच्युअल फंड कैलकुलेटर

म्युच्युअल फंड्स सही है??

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला काही मुलभूत औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. या औपचारिकता एखाद्या मालमत्ता व्यवस्थापन संस्थेच्या (एएमसीच्या) ऑफिसमध्ये जाऊन, किंवा एखाद्या अधिकृत पॉइंट ऑफ अ‍ॅक्सेप्टंस (पीओए) वर, किंवा एखाद्या सल्लागार, बँक, वितरक किंवा ब्रोकरसारख्या अधिकृत मध्यस्थाकडून पूर्ण केल्या जाऊ शकतात.

कुठल्याही म्युच्युअल फंड स्किम्समध्ये गुंतवणूक करण्याआधी आपल्याला नो युवर कस्टमर म्हणजेच केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पूर्ण भरून दिलेला केवायसी फॉर्म स्किमच्या अर्जासोबत सुपूर्त केला जाऊ शकतो (ज्याला की इन्फर्मेशन मेमोरेंडम म्हणजेच मुख्य माहिती मेमो म्हणतात). अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक भरला गेला पाहिजे कारण यात महत्त्वाचा तपशील भरला जातो, जसे सर्व खातेधारकांची नावे, पॅन नंबर, बँक खात्याचे तपशील वगैरे. यावर सर्व खातेधारकांच्या सह्या असतात. यातील अनेक गोष्टी ऑनलाइनही केल्या जाऊ शकतात.

नवीन गुंतवणूकदार त्यांच्या सल्लागारांकडून मदत घेऊ शकतात, जेणेकरून संपूर्ण प्रक्रिया सहज आणि सोपी होईल. आणि गुंतवणूक करण्याआधी, सर्व गुंतवणूकदारांना हा सल्ला दिला जातो की त्यांनी स्किम संबंधी कागदपत्रे वाचून त्यांनी निवडलेल्या स्किममधील जोखमी समजून घ्याव्यात.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे