म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणुक करण्याचा कमीत कमी आणि जास्तीत जास्त कालावधी किती असतो?

म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणुक करण्याचा कमीत कमी आणि जास्तीत जास्त कालावधी किती असतो?

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंड्स मधील गुंतवणुकीचा कमीत कमी कालावधी एक दिवस तर जास्तीत जास्त कालावधी ‘अमर्यादित’ असतो.

कदाचित कमीत कमी कालावधी समजून घेण्यास सोपा आहे म्हणजे एका ठराविक एनएव्हीला युनिट्स खरेदी केले आणि दुस-या दिवशी जी एनएव्ही असेल त्याला ते विकले. पण, जास्तीत जास्त कालावधीचे ‘अमर्यादित’ स्वरुप काय आहे? भारतामध्ये दररोज एनएव्ही असणा-या काही ओपन एंडेड स्किम्स आहेत, ज्या 20 वर्षापेक्षा अधिक काळापासून आहेत. आणि असे गुंतवणुकदारही आहेत ज्यांनी ह्या कालावधीसाठी गुंतवणुक केलेली आहे! जोपर्यंत स्किम कार्यरत आहे तसेच खरेदी आणि विक्रीसाठी एनएव्ही देत आहे, तोपर्यंत गुंतवणुकदार त्यातील गुंतवणूक तशीच ठेवायचा विचार करु शकतो. जोपर्यंत फंड हाऊस विश्वस्तांची मंजूरी घेऊन बंद करण्याचे ठरवत नाही तोपर्यंत ओपन एंड फंड चालूच राहतो.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे