म्युच्युअल फंड्समध्ये अल्पवयीन व्यक्ती गुंतवणुक करु शकते का?

म्युच्युअल फंड्समध्ये अल्पवयीन व्यक्ती गुंतवणुक करु शकते का?

म्युच्युअल फंड सही आहे?

18 वर्षाखालील (अल्पवयीन) कोणीही व्यक्ती आईवडील/कायदेशीर पालकांच्या मदतीने 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणुक करु शकते. आईवडील/पालनकर्त्याकडून प्रतिनिधित्व केली जाणारी अल्पवयीन व्यक्ती ही एकमेव खातेधारक असणे गरजेचे आहे. अल्पवयीन व्यक्तीच्या म्युच्युअल फंड फोलिओमध्ये संयुक्त खाते असण्यास परवानगी नसते. प्रत्येकाने अल्पवयीन व्यक्तीसाठी गुंतवणुक करताना त्याची [गुंतवणूक] उद्दीष्ट असणे गरजेचे आहे जी म्युच्युअल फंड्सच्या साहाय्याने साध्य झाली पाहीजेत जसे की उच्च शिक्षणासाठी निधी.

एकदा पाल्याने 18 वय पूर्ण केले की तो प्रौढ होतो, तेव्हा आपण आईवडील/पालक म्हणून एकमेव खातेदाराच्या दर्जामध्ये अल्पवयीन ते प्रौढ असा पहिला बदल करुन घेणे गरजेचे असते, नाहीतर संबंधित खात्यातील सर्व व्यवहार स्थगित केले जातात. 18 वर्षावरील कोणत्याही गुंतवणूकदाराला जो करभार असतो तो आता एकमेव खातेदार म्हणून लागू केला जाईल. जोपर्यंत पाल्य अल्पवयीन आहे, तोपर्यंत पाल्याच्या पोर्टफोलिओमधून येणारे सगळे उत्पन्न आणि लाभ हे पालकांच्या उत्पन्नामध्ये जोडले जातात आणि पालक त्यावरील प्राप्त कराचा भरणा करतात. ज्यावर्षी पाल्य प्रौढ होईल, तो/ती ही स्वतंत्र व्यक्ती म्हणून गणली जाते आणि ज्यावर्षात तो/ती प्रौढ होईल त्या महिन्यापासुन कर भरण्यास योग्य होईल.

459
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे