जर गुंतवणूकदाराचे निधन झाले तर त्यांच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे काय होते?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

आपण जर क्लोज-एंडेड ईएलएसएस (ELSS) किंवा एफएमपी(FMP)सारख्या क्लोज-एंडेड स्किम्स मध्ये गुंतवणूक केलेली नसेल तरम्युच्युअल फ़ंड स्किम्सना साधारणतः मुदतपूर्तीची तारीख नसते. आपण जर एसआयपी करत असाल, तर त्यात ठराविक कालावधी असतो ज्यासाठी ती गुंतवणूक नियमितपणे करणे गरजेचे असते. एसआयपीचा कालावधी चालू असताना किंवा क्लोज-एंडेड स्किमची मूदतपूर्ती होण्याआधी जर गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर, नामनिर्देशित व्यक्तीने, तसेच जर संयुक्त खाते असेल, तर उत्तरजीवी व्यक्तीने किंवा कायदेशीर वारसदाराने नेमून दिलेली प्रक्रिया हक्क सांगण्यासाठीपूर्ण करणे गरजेचे असते. त्या प्रक्रियेला म्हणतात ट्रान्समिशन. एखाद्या व्यक्तीस जर ट्रान्समिशनची प्रक्रिया करायची असेल, तर सगळ्यात आधी त्या व्यक्तीला आपली म्युच्युअल फंड गुंतवणूक कुठे आहे ते माहिती असणे गरजेचे असते, नाही तर ती गुंतवणुक दावा न करता कायमची तशीच राहू शकते.

त्यामुळे, म्युच्युअल फ़ंड गुंतवणूकीमध्ये सुद्धा इतर गुंतवणुकीप्रमाणेच नामनिर्देशित व्यक्ती ठेवण्याचा आणि त्या व्यक्तीस त्याबद्दल माहिती देण्याचा कायम सल्ला दिला जातो. जर आपले संयुक्त खाते असेल तर, खात्यात नमूद केलेली उत्तरजीवी व्यक्ती ट्रान्समिशन साठी दावा करू शकते. पण जर आपल्या फोलिओ मध्ये नामनिर्देशितव्यक्ती नसेल किंवा संयुक्त खाते सुद्धा नसेल तर, आपले कायदेशीर वारसदार सगळी आवश्यक कागदपत्रे आणि मृत्यूच्या दाखल्यासहित सगळे पुरावे सादर करुन ट्रान्समिशन साठी अर्ज करु शकतात. ज्या व्यक्तीने ट्रान्समिशन साठी अर्ज केला आहे त्या व्यक्तीचे केवायसी नोंदणीकृत असणे गरजेचे आहे.

452
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे