म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे योग्य की क्रिप्टोकरंसीमध्ये?

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे योग्य की क्रिप्टोकरंसीमध्ये? zoom-icon
म्युच्युअल फंड कैलकुलेटर

म्युच्युअल फंड सही आहे?

तंत्रज्ञान सतत पुढे जात आहे आणि त्याबरोबरच आजकाल आर्थिक सेवा आणि गुंतवणुकीची साधने ज्या प्रकारे उपलब्ध करून दिली जातात त्यात सातत्याने बदल होत आहेत. आता तर आपण जवळ-जवळ सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकी ऑनलाइन करू शकतो. हा फार चांगला बदल आहे आणि यामुळे आपल्याला अनेक नवीन संधी मिळतात तसेच नवीन समस्यांना सामोरे जावे लागते. क्रिप्टोकरंसी असाच एक प्रकार आहे. पाहूया, क्रिप्टोकरंसी म्हणजे नक्की काय.

क्रिप्टोकरंसी एक अशी व्हर्चुअल संपत्ति आहे ज्याचा वापर क्रिप्टोकरंसीचे मालक आपसात देवाण-घेवाण करण्याच्या एका माध्यमाप्रमाणे करू शकतात. क्रिप्टोकरंसीचे सर्व व्यवहार खाते (ledger) स्वरूपात एका डेटाबेसमध्ये स्टोअर केले जातात आणि हे ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरणाऱ्या एका नेटवर्कद्वारे आपसात कनेक्टेड असतात. त्यामुळे, क्रिप्टोकरंसी भौतिक स्वरूपात आस्तित्त्वात नसते आणि तिला केंद्रीय बँकेकडून जारी केले जात नाही. म्हणूनच आपण भारतात क्रिप्टोकरंसीचा वापर पैशासारखा करू शकत नाही. क्रिप्टोकरंसीची परिस्थिती स्पष्ट नाही कारण क्रिप्टोकरंसीला पैसे, मालमत्ता, स्टॉक किंवा वस्तू मानावे हे अजून ठरलेले नाही आणि रिझर्व बँकेने किंवा भारतातील कुठल्याही नियामक संस्थेने क्रिप्टकरंसीला मान्यता दिलेली नाही. 

पारदर्शकता, सुटसुटीतपणा, विभाजन जाणे आणि जोखीम पत्करण्यासाठी तयार असलेल्या लोकांसाठी गुंतवणुकीचे एक छान साधन असे क्रिप्टोकरंसीचे अनेक फायदे असले, तरीही क्रिप्टोकरंसीशी निगडित जोखमींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जरी भारत शासनाने भारतात क्रिप्टोकरंसीवर निर्बंध घातलेला नाही, तरीही कुठल्याही कायद्याखाली क्रिप्टोकरंसीची परिस्थिती अजून स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे याला एक अस्पष्ट मालमत्ता म्हणता येईल. या मालमत्तेमध्ये चढ-उतार खूपच जास्त असतात. क्रिप्टोकरंसीमध्ये दोन पक्षांच्या दरम्यान देवाण-घेवाण करण्यासाठी बँकेची गरज पडत नाही, त्यामुळे मनी लाँडरिंग आणि फसवणूक दोन्हीची शक्यता असते. सरकारी नियम नसल्यामुळे लहान आणि माहिती नसलेले गुंतवणूकदार आपला कष्टाने मिळवलेला पैसा गमावू शकतात.

आपली कष्टाची कमाई नेहमी अशा ठिकाणी गुंतवावी जिथे सरकारी नियम चांगल्या पद्धतीने राबवले जातात, जसे म्युच्युअल फंड, स्टॉक, बाँड, विमा पॉलिसी वगैरे. क्रिप्टोकरंसी सध्या फॅशनमध्ये आहे पण त्यासाठी कुठल्याही सरकारी एजेंसीकडून नियम केलेले नाहीत. कायदेशीर मान्यता नाही आणि चढ-उतार फार जास्त तर आहेतच, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर टॅक्स कसा आकारला जाईल याबद्दल स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्यामुळे हे माहीत नाही की जर यामध्ये तुम्ही नफा मिळवलात, तर त्यावर टॅक्स कसा लागेल. जर आपल्याला म्युच्युअल फंड समजण्यासाठी कठीण वाटतात, तर क्रिप्टोकरंसीच्या जटिलतेबद्दल आपल्याला कल्पनासुद्धा करता येणार नाही कारण एक गुंतवणूक म्हणून याचे मूल्य कसे ठरवावे किंवा आपल्या आर्थिक उद्दिष्टांसाठी आपण यावर अवलंबून राहू शकता किंवा नाही अशा प्रकारची माहिती देणारे तज्ज्ञ फारच कमी आहेत.

म्युच्युअल फंड फार काळापासून सुरू आहेत, यात SEBI सारख्या संस्थेकडून गुंतवणूकदारांना संरक्षण दिले जाते, आपल्या आर्थिक उद्दिष्टांप्रमाणे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, यावर लक्ष ठेवणे सोपे आहे आणि कंपनीकडून दरमहा पोर्टफोलिओचे प्रकटीकरण (डिस्क्लोज़र) केले जाते त्यामुळे गुंतवणूकदारांना आपले निर्णय घेण्यात मोठी मदत होते. म्युच्युअल फंडसाठी तक्रार निवारण यंत्रणासुद्धा उपलब्ध आहे. या सर्व बाबींमुळे गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण होण्यात मदत मिळते. क्रिप्टोकरंसीमध्ये अशा कुठल्याच बाबी नाहीत, त्यामुळे आपल्या कष्टाची कमाई त्यात गुंतवणे फार जोखमीचे आहे.

आपल्या कष्टाचा पैसा कुठेही गुंतवण्याआधी त्या पर्यायाचे गुण-दोष नक्कीच पहावे - मग हा पर्याय क्रिप्टोकरंसी असो, म्युच्युअल फंड असो किंवा इतर कुठलीही मालमत्ता असो. आपल्या जोखीम पत्करण्याच्या क्षमतेप्रमाणे आणि परताव्याच्या अपेक्षेप्रमाणे आपल्यासाठी गुंतवणुकीचा कुठला पर्याय योग्य आहे याचा निर्णय घेण्यासाठी स्वतः अभ्यास करा. जर आपल्याला स्वतः कुठलाही निर्णय घेता येत नसेल, तर मदतीसाठी एखाद्या SEBI कडे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार / म्युच्युअल फंड वितरकाशी बोला, पण हे निर्णय घेताना घाई करू नका किंवा वर्तमानपत्राच्या बातम्यांवर जाऊ नका. गुंतवणुकीचे निर्णय संपूर्ण आयुष्यासाठी असतात त्यामुळे हे निर्णय घेण्यासाठी घाई न केलेलीच बरी.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे