पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्किम्सपेक्षा म्युच्युअल फंड्स कसे वेगळे आहेत?

पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्किम्सपेक्षा म्युच्युअल फंड्स कसे वेगळे आहेत? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंड्स आणि पोर्ट्फोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस(PMS) हे गुंतवणुकदारांना, व्यावसायिक फंड व्यवस्थापक सांभाळत असलेल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून, स्टॉक्स आणि बॉन्ड्समध्ये गुंतवणुक करण्याची परवानगी देतात हे दोन्हीही गुंतवणुकीचे विभिन्न पर्याय आहेत, ज्यांची उद्दिष्टे वेगवेगळी आहेत आणि दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी तयार करण्यात आलेल्या आहेत.

कोणीही व्यक्ती म्युच्युअल फंड मध्ये दर महिना कमीत कमी 500/- रुपयानेही गुंतवणुक करु शकते, पण पीएमएस(PMS) स्किम्स मध्ये कमीत कमी रु.25 लाखाची गुंतवणूक करावी लागते, कारण ते सर्वप्रथम एचएनआय(HNI) ला समोर ठेवून तयार केलेले संपत्ती व्यवस्थापन उत्पादन आहे. म्युच्युअल फंड्स वर सेबीचे नियंत्रण असते तर पीएमएस(PMS) स्किम्स साठी कोणत्याही कडक नियमांचे बंधन नसते. तसेच, पीएमएस (PMS) उत्पादने ही त्यातील जोखमीचे ज्ञान असलेल्या अनुभवी गुंतवणूकदारांसाठी आहेत, त्यामुळे PMS फंड्स हे सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करतात, ज्यामध्ये बाजारात सहजासहजी व्यवहार होण्याची शक्यता नसते. म्युच्युअल फंड्स अशा सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करतात ज्या रोख रक्कम(लिक्विड) देणाऱ्या आहेत. म्युच्युअल फंड्स हे PMS स्किम्स पेक्षा कमी जोखमीचे आहेत कारण त्यात व्यापक वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आहे. PMS फंड्स मध्ये साधारणतः 20-30 स्टॉक्सचा मर्यादित पोर्टफोलिओ असतो. त्यामुळे, फंड व्यवस्थापकाच्या स्टॉक निवडण्याच्या क्षमतेवर फंडची कामगिरी पूर्णपणे अवलंबून असते. 

PMS फंड्स मध्ये उच्च फंड मॅनेजमेंट फी सोडून प्रवेश भार आणि निर्गमन भारही अधिक असतो. म्युच्युअल फंड्स मध्ये प्रवेश भार नसतो आणि असला तर कमीत कमी निर्गमन भार असतो. म्युच्युअल फंड्स हे रिटेल गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत तर PMS हे रिटेल गुंतवणूकदारांसाठी नाहीत.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे