ELSS फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे काय फायदे आहेत?

ELSS फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे काय फायदे आहेत? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

इक्विटी लिंक्ड सेव्हिग स्कीम असे इक्विटी- ओरिएंटेड कर-बचत करून देणारे म्युच्युअल फंड असतात ज्यांच्याद्वारे आपण मिळकत कर कायद्याच्या कलम 80C प्रमाणे कर-बचत करू शकता आणि इक्विटीच्या वाढीच्या शक्यतेचा फायदासुद्धा आपल्याला घेता येतो. या दोन फायद्यांसोबतच, त्यांचा लॉक-इन कालावधी 3 वर्षांचा असतो, हा लॉक-इन कालावधी इतर सर्व कर-बचत करून देणाऱ्या बचतीच्या साधनांपैकी सर्वात कमी आहे.

इक्विटी-ओरिएंटेड म्युच्युअल फंड असल्यामुळे ELSS मध्ये काही इतर फायदेसुद्धा आहेत. आपण ELSS मध्ये आपल्या सोयीप्रमाणे SIP द्वारे किंवा एकरकमी गुंतवणूक करू शकता. पगारदार वर्गाच्या लोकांसाठी SIPची सोय उत्तम आहे कारण त्यांना कर-बचत करण्यासाठी वर्षाच्या अखेरी एकरकमी गुंतवणूक करण्यापेक्षा दर महिन्याला एक निश्चित रक्कम बाजूला काढून ठेवणे सोपे जाते. ते अनेक वर्षे SIP सुरू ठेवू शकतात कारण त्यांची नोकरी अनेक वर्षे सुरू असते.

3 वर्षांचा लॉक-इन कालावधी गरजेचा असला, तरीही गुंतवणूकदाराला लॉक-इन कालावधी संपल्यानंतर सुद्धा आपली गुंतवणूक सुरू ठेवता येते, इतर कर-बचतीच्या साधनांमध्ये तसे नाही कारण त्यांत लॉक-इन कालावधी संपल्यावर आपला पैसा स्वतःच वटण्यास योग्य होतो किंवा त्यावर व्याज मिळणे बंद होते. गुंतवणूकदार त्यांना पाहिजे तेवढ्या कालावधीसाठी फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात आणि ते जेवढ्या अधिक काळासाठी गुंतवणूक करतील, तेवढीच त्यांची गुंतवणुकीची जोखीम कमी होते आणि काळानुसार अधिक परतावा मिळण्याची शक्यता वाढत जाते.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे