जर मी पुरेशी बचत केलेली असेल तर मला निवृत्तीसाठी नियोजन करण्याची गरज काय?

जर मी पुरेशी बचत केलेली असेल तर मला निवृत्तीसाठी नियोजन करण्याची गरज काय?

म्युच्युअल फंड सही आहे?

आपले सध्याचे वय आणि वित्तीय परिस्थिती काहीही असो, उद्या काय होणार हे आपल्याला माहीत नसते. जर उद्या काय होणार हे आपल्याला माहीत नाही, तर आपल्याला हे कसे कळेल की आपण निवृत्तीसाठी करून ठेवलेली बचत आपल्याला शेवटपर्यंत पुरणार आहे? अपेक्षित आयुर्मर्यादा आणि डॉक्टर-औषधांचा खर्च दोन्ही वाढत आहेत आणि आपल्याला सांगता येणार नाही की निवृत्तीनंतरचे आपले आयुष्य एका दशकाचे असेल किंवा तीन दशकांचे. कुठल्याही वित्तीय नियोजनाला नीट काम करण्यासाठी कालावधी माहीत असणे गरजेचे असते, पण अशा बाबतीत कालावधी मुळीच निश्चित नाही. म्हणूनच, निवृत्तीनंतरचा आपला निधी गरजेपेक्षा थोडा अधिक हवा.

पण आपण अधिक निधी कसा निर्माण करू शकता, जेव्हा आपली सध्याची वित्तीय उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठीच आपली ओढाताण होते आहे? आपण आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आपल्या सध्याच्या बचतीची गुंतवणूक अशा साधनांमध्ये करू शकता जी दिर्घकालामध्ये चलनवाढीवर मात करतील आणि मालमत्ता निर्मिती करू शकतील. उदाहरणार्थ, म्युच्युअल फंड. निवृत्तीसाठी अधिक निधीमुळे आपल्याला वैद्यकीय आणीबाणी किंवा इतर अप्रिय प्रसंगांच्या वेळी मदत होते.

तसेच, आपण आपल्या मुलांवरील किंवा नातवंडांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रसंगी त्यांना भेट म्हणून काही वस्तू देऊ शकता, किंवा मित्रांना, नातेवाइकांना भेटण्यासाठी लांबचा प्रवास करू शकता, किंवा स्वतःसाठी चैनीच्या वस्तू घेऊ शकता. निवृत्तीनंतर अशी चैन करण्यासाठी कितीही मोठा निधी असला तर चालेल, नाही का!

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे