स्किम संबंधित दस्तऐवज म्हणजे काय? या दस्तऐवजांमध्ये कोणती माहिती दिलेली असते?

स्किम संबंधित दस्तऐवज म्हणजे काय? या दस्तऐवजांमध्ये कोणती माहिती दिलेली असते?

म्युच्युअल फंड सही आहे?

मुच्युअल फंडच्या सर्व जाहिरातींमध्ये एक संदेश दिलेला असतो: “स्किम संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.” हे दस्तऐवज काय आहेत?

येथे 3 महत्त्वाचे दस्तऐवज आहेत: मुख्य माहितीचे निवेदन पत्र(केआयएम), स्किमच्या माहितीचे दस्तऐवज (एसआयडी) आणि अतिरिक्त माहितीचे विधान(एसएआय).

हे सर्व एखाद्या ठराविक स्किमसाठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी(एएमसी) द्वारे तयार केले जातात आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी) यांची मान्यता मिळवण्यासाठी दाखल केले जातात.

एसआयडी मध्ये पुढील माहिती असते:

  1. सर्व मूलभूत वैशिष्ट्ये, जसे की, गुंतवणुकीची उद्दिष्टे आणि धोरणे, असेट अलोकेशन पैटर्न, शुल्क आणि लिक्विडीटीची(रोख रक्कम काढण्याची) सोय.
  2. फंड व्यवस्थापन संघाचे तपशील,
  3. स्किमच्या जोखमीचे सर्व घटक तसेच जोखीम कमी करण्याची यंत्रणा.
  4. स्किमचे तपशील, जसे की, भार, योजना आणि पर्याय, मागील कामगिरी, मापदंड. 
  5. सामान्य युनिट धारकांची माहिती.
  6. इतर तपशील, जसे की, एएमसी शाखा, गुंतवणूकदार सेवा केंद्र, स्वीकृतीची अधिकृत ठिकाणे.
     

एसएआय मध्ये पुढील माहिती असते: 

  1. म्युच्युअल फंड प्रायोजकांची समिती, असेट मेनेजमेंट कंपन्या आणि ट्रस्टीज.
  2. एएमसीच्या महत्वाच्या व्यक्तींची माहिती आणि त्यांचे सहकारी, जसे की, रजिस्ट्रार्स, कस्टोडियन, बँकर्स, लेखापरीक्षक आणि कायदेशीर सल्लागार.
  3. सर्व आर्थिक आणि कायदेशीर बाबी.

केआयएम हे एसआयडी चे संक्षिप्त रूप असते, जे नोंदणी अर्जा बरोबर जोडलेले असते. त्याच्या नावाप्रमाणेच त्यामध्ये सर्व महत्त्वाची माहिती असते, जी गुंतवणूकदाराने स्किम मध्ये गुंतवणूक करण्याआधी जाणून घेतली पाहिजे. केआयएम हे प्रत्येक अर्जाबरोबर उपलब्ध करून दिलेले असावे.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे