एनपीएस आणि म्युचूअल फंड्समधील फरक जाणून घ्या

एनपीएस आणि म्युचूअल फंड्समधील फरक जाणून घ्या zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

राष्ट्रीय बचत योजना किंवा एनपीएस, एक निवृत्तीतील फायदा मिळवून देणारी योजना आहे जी भारत सरकारने 2004 मध्ये सुरू केली. तर दुसर्‍या बाजूला, म्युचूअल फंड, एक असे गुंतवणुकीचे साधन आहे जे स्टॉक्स, बॉन्ड्स, किंवा इतर सिक्युरिटीजने बनलेले आहे जे व्यावसायिक फंड व्यवस्थापकाकडून हाताळले जाते. 

एनपीएस विरुद्ध म्युचुअल फंड्स – दोन्ही गुंतवणुकी समजून घेणे

एनपीएस: नॅशनल पेंशन स्कीम (एनपीएस) ही भारतीयांना निवृत्तीपश्चात उत्पन्न देणारी भारत सरकारने सुरू केलेली एक स्वेच्छेने घेता येण्यासारखी पेंशन योजना आहे. ही योजना पेंशन फंड निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण द्वारे संचालित केली जाते. ही एक बाजाराशी जोडलेली योजना आहे ज्यामुळे गुंतवणूकदार इक्विटी, कॉर्पोरेट कर्ज, सरकारी कर्ज, आणि पर्यायी असेट्सच्या एकत्रित समीकरणामध्ये गुंतवणूक करू शकतात. 

एनपीएस दोन प्रकारची खाती प्रदान करते, टियर I आणि टियर II. गुंतवणूकदार 60 वर्ष वयाचे होईपर्यंत टियर I मधून पैसे काढू शकत नाही. मात्र, टियर II हे ऐच्छिक आहे, आणि या खात्याची सुविधा घेण्यास पात्र होण्यासाठी, गुंतवणूकदाराचे टियर I खाते असणे गरजेचे आहे. टियर I पेक्षा वेगळे असलेल्या, टियर II खात्यामध्ये मात्र, गुंतवणूकदार केव्हाही फंड्स काढून घेऊ शकतात. 

नॅशनल पेंशन योजना ही अशी गुंतवणूक आहे जी देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये असंघटित क्षेत्रातील कामगार समाविष्ट होतात. ही एक उतार वयात आर्थिक सुरक्षितता देणारी एक संरचित पेंशन बचत योजना आहे. एनपीएसमध्ये भरणा केलेल्या रकमा ह्या विविध असेट वर्गांमध्ये विखुरल्या जातात जसे की इक्विटी, कॉर्पोरेट बॉन्ड्स, सरकारी रोखे, आणि आणखीन बरेच काही. तसेच, ही योजना असेट वाटपाच्या बाबत सक्रिय निवड आणि स्वयं निवड यामार्फत एक फ्लेक्सिबिलिटी प्रदान करते.

60 व्या वर पोहोचल्यावर, एनपीएस खाते परिपक्व होते, आणि गुंतवणूकदार एकरकमी रक्कम म्हणून परिपक्व मूल्याच्या 60% रक्कम काढून घेऊ शकतात. उर्वरित 40% शिल्लक रक्कम ही नियमित पेंशन वार्षिकीसाठी वापर करू शकतात. 

म्युचूअल फंड्स: म्युचूअल फंड्स एक व्यावसायिक दृष्ट्‍या व्यस्थापित केलेले गुंतवणुकीचे साधन आहे जे असेट्स, ज्यामध्ये स्टॉक्स, बॉन्ड्स, आणि मनी मार्केट साधने विकत घेण्यासाठी विविध गुंतवणूकदारांकडून पैसे घेतात. अगदी सोप्या भाषेत, हे एक पैसे गुंतवण्याचे साधन आहे, जिथे एक समान गुंतवणुकीचे उद्दिष्ट समोर ठेवून गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले जातात.

म्युचुअल फंड्समधले विविध प्रकार वैविध्यपूर्ण गुंतवणुकीतील प्राधान्य ज्यामध्ये सक्रिय, निष्क्रिय, इक्विटी, निश्चित उत्पन्न, समतोल फंड्स, आणि अधिक प्रकारांसंबंधी सेवा देतात. प्रत्येक फंडचा प्रकार त्याची अनोखी वैशिष्ट्ये, संभाव्य बक्षिसे, आणि संबंधित जोखमींसह येतात. मुख्य म्हणजे, यातील सर्वाधिक म्युचूअल फंड्स हे कोणताही लॉक इन कालावधी न लादता एक लवचिकता प्रदान करतात. ही लवचिकता गुंतवणूकदारांना त्यांच्या पसंतीच्या फंड्ससह त्यांची विशिष्ट आर्थिक उद्दिष्टे, जोखीम घेण्याची क्षमता, आणि गुंतवणूक क्षितिजांशी समन्वय साधण्यास मदत करतात ज्याद्वारे त्यांच्यामध्ये योग्य अचूक आणि वैयक्तिक गुंतवणुकीसंबंधी निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते.

अस्वीकरण

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

286
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे