एनएव्ही कमी किंवा अधिक असल्यामुळे आपल्या गुंतवणुकीच्या निर्णयावर प्रभाव पडला पाहिजे का?

एनएव्ही कमी किंवा अधिक असल्यामुळे आपल्या गुंतवणुकीच्या निर्णयावर प्रभाव पडला पाहिजे का?

म्युच्युअल फंड सही आहे?

जेव्हा आपण 'लार्ज’ किंवा 'रेग्युलर’ पिझ्झा मागवता, तेव्हा त्यांच्या चवीमध्ये काही फरक पडतो का? मुळीच नाही! दोन्हीची तयार करण्याची पद्धत आणि प्रक्रिया सारखीच असते. फक्त त्यांच्या आकारामध्ये आणि किंमतीमध्ये फरक असतो. कुठल्याही आकाराचा असला, तरीही फार्महाउस पिझ्झाची चव सारखीच असते.

म्युच्युअल फंडची चव देखील या पिझ्झा सारखीच असते. जेव्हा आपण एखादा फंड विकत घेता, तेव्हा आपल्याला त्याचे युनिट खरेदी करण्यासाठी त्याची किंमत, म्हणजे एनएव्ही द्यावी लागते. बरेच गुंतवणूकदार असलेल्या मोठ्या फंडकडे अधिक मालमत्ता असेल आणि त्यामुळे त्याचा एनएव्ही अधिक असेल. पण तोच फंड बाजारात आला त्यावेळी त्याच फंडचा एनएव्ही बराच कमी असेल, कारण फंडचा एनएव्ही कालाप्रमाणे वाढत असतो कारण अधिक गुंतवणूकदार एकत्र आल्याने फंड वाढत जातो. पण याचा अर्थ असा होतो का, की फंडच्या कृतीमध्ये किंवा त्याच्या रचनेच्या प्रक्रियेमध्ये बदल झालेला आहे? 

जो पर्यंत फंडच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट बदलत नाही, तो पर्यंत मालमत्तेच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये गुंतवणूक आणि सिक्युरिटीजचे प्रकार आणि फंड व्यवस्थापनाची प्रक्रिया हे सर्व तेच राहते. त्यामुळे आपला परतावा तेवढाच राहील, मग फंडचा एनएव्ही कितीही असो, हे तसेच आहे जसे आकार कितीही लहान किंवा मोठा असला तरीही आपल्या फार्महाउस पिझ्झाच्या कुठल्याही स्लाइसची चव सारखीच असते.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे