नवीन कर-प्रणाली लागू होत असताना आपण ELSS मध्ये गुंतवणूक करावी का?

नवीन कर-प्रणाली लागू होत असताना आपण ELSS मध्ये गुंतवणूक करावी का?

म्युच्युअल फंड सही आहे?

1 एप्रिल 2020 पासून सुरू होणाऱ्या नवीन कर प्रणालीमध्ये करदात्या व्यक्तींना आणि हिंदू अविभाजित कुटुंबाला हा पर्याय मिळतो की कराचा कमी दर आकारला जाईल पण सूट मिळणार नाही; किंवा कराचा अधिक दर आकारला जाईल पण सूट मिळेल (जुनी कर-प्रणाली). नवीन कर प्रणाली सर्वांसाठीच योग्य असेल असे नाही. करदात्यांनी जुन्या आणि नवीन दोन्ही प्रणालींमधील कर-बचतीचे मूल्यमापन करावे आणि नंतरच निर्णय घ्यावा.

ज्या करदात्यांचे गृहकर्ज किंवा शिक्षण कर्जाचे हप्ते सुरू आहेत, विमा पॉलिसी सुरू आहेत, 15 लाखांपेक्षा अधिक पगार आहे किंवा सूट मिळण्याचा फायदा घेऊन जे अधिक बचत करू शकतात, त्यांच्यासाठी जुनी प्रणालीच योग्य ठरू शकते. त्यामुळे, असे करदाते जुन्या कर प्रणालीमध्ये  ELSS मध्ये गुंतवणूक करण्याबद्दल विचार करू शकतात. जुन्या कर प्रणालीच्या तुलनेत नवीन कर प्रणाली वर्षाच्या शेवटी आपल्याला अनेक कागदपत्रे दाखल करण्याच्या भानगडीतून वाचवते कारण यात गुंतवणुकीचे पुरावे द्यावे लागत नाहीत, पण जुनी कर प्रणाली आपल्याला गुंतवणूक आणि बचत याबद्दल अनेक निर्णय घेण्यास मदत करते. यात आपल्याला वार्षिक गुंतवणूक किंवा बचत करणे भागच असते, मग ते ELSS मध्ये असो, पेंशन योजनेत असो किंवा पीपीएफमध्ये असो. ELSS मध्ये काही करदात्यांच्या SIP आधीपासूनच सुरू असतील. SIP थांबवण्याआधी त्यांनी दोन्ही कर प्रणालींमधील फायदे पडताळून पाहिले पाहिजेत.

कुठल्या कर प्रणालीमध्ये आपल्याला अधिक कर-बचत मिळेल हे सर्वस्वी आपल्या मिळकतीवर आणि पगाराच्या रचनेवर अवलंबून असेल? जर आपल्याला स्वतः दोन्ही कर प्रणालींमधील कर-दायित्व मोजता येत नसेल, तर आपल्याला एखाद्या कर-सल्लागाराचा सल्ला घेतला पाहिजे. अशी तुलना केल्यानंतरच आपल्याला निर्णय घेता येईल की ELSS मधील गुंतवणूक सुरू ठेवावी किंवा नाही कारण यात आपल्याला फक्त कर-बचतीचा फायदा मिळतो असे नाही, तर इक्विटीच्या वाढीची शक्यतासुद्धा असते. जरी नवीन कर प्रणाली आपल्यासाठी अधिक योग्य असली, तरीही आपण मालमत्ता निर्मितीच्या दृष्टीने ELSS मध्ये गुंतवणूक करण्याबद्दल विचार करू शकता. जर आपण अशी व्यक्ती आहात जी चढ-उतार अधिक असलेल्या मार्केटमधून पैसे काढून घेते, तर लॉक-इन कालावधीमुळे अल्प कालावधीतील चढ-उताराला न घाबरता आपण आपली गुंतवणूक त्यातच ठेवाल. ELSS चा लॉक-इन कालावधी 3 वर्षांचा असल्यामुळे, जर आपण आज गुंतवणूक केलीत, तर एकरकमी गुंतवणूक आपण 3 वषे पूर्ण झाल्यावरच काढू शकाल. हा लॉक-इन कालावधी प्रत्येक SIP साठी सुद्धा लागू आहे. जर आपल्याला 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये गुंतवलेली संपूर्ण रक्कम काढून घ्यायची असेल, तर आपल्या शेवटच्या SIP च्या हप्त्याला 3 वर्षे पूर्ण होई पर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे