माझ्या आर्थिक उद्दिष्टांचे नियोजन करण्यासाठी इतर कोणी व्यक्ती मला मदत करू शकते का?

माझ्या आर्थिक उद्दिष्टांचे नियोजन करण्यासाठी इतर कोणी व्यक्ती मला मदत करू शकते का?

म्युच्युअल फंड सही आहे?

"माझा मुलगा नववीत शिकत आहे. त्याच्या आवडी-निवडीबद्दल किंवा त्याने पुढील शिक्षणासाठी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा ह्याबद्दल मी साशंक आहे. त्याने सायन्स घ्यावे, कॉमर्स की, आर्ट्स? कोणी माझी मदत करु शकेल का?" अनेक पालकांचे असे प्रश्न असतात. यासाठी आपण एखाद्या शैक्षणिक सल्लागाराची किंवा करीअर समुपदेशकाची मदत घेऊ शकता ज्यांच्याकडे विद्यार्थांसाठी मूल्यमापन केलेले वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात.

वरील परिस्थितीमध्ये जशी पालकांची अवस्था आहे तशीच अवस्था असलेला गुंतवणूकदार आर्थिक उद्दीष्ट्यांचे नियोजन साधण्यासाठी मदत घेऊ शकतात. आज गुंतवणूकदाराकडे माहितीचा ओघ इतका सहज आहे की मन थक्क होऊन जाते. अशावेळी घाबरून जाणे किंवा चुका करणे सहज शक्य असते.

यासाठी आपण एका गुंतवणूक सल्लागारास किंवा म्युचुअल फंड वितरकास प्राधान्य देणे आवश्यक असते. 

ते गुंतवणूकदाराच्या आर्थिक परिस्थितीचे मूल्यमापन करतात आणि त्यांच्या आर्थिक उद्दीष्टांची काळजी घेतात. त्याआधारे, सल्लागार आपल्याला गुंतवणुकीसाठी अनेक स्किम्सबद्दल सांगतील. हे तर स्पष्टच आहे की अशा व्यक्तीला अनेक म्युच्युअल फंड स्किम्सबद्दल ज्ञान असायला हवे आणि गुंतवणूकदारांच्या परिस्थितीवर, तसेच त्यांनी निवडलेल्या स्किम्सवर सुद्धा बारीक आणि नियमित लक्ष ठेवणे गरजेचे असते. अशा दृष्टीकोनामुळे, गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करुन आपली आर्थिक उद्दीष्ट्ये साध्य करण्यास मदत होते. द्वारे पूर्ण करता येते.

459
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे