संपूर्ण परतावा म्हणजे काय?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

आपण लोकांना असे म्हणताना ऐकले आहे का, "मी हे घर 2004 मध्ये 30 लाखाला घेतले होते. आज याची किंमत 1.2 कोटी आहे! याची किंमत 15 वर्षांमध्ये 4 पटीने वाढली आहे." हे संपूर्ण परताव्याचे उदाहरण आहे. जेव्हा आपण एखाद्या गुंतवणुकीच्या मूळ रकमेची तुलना तिला विकताना मिळालेल्या किंमतीशी करत094B, तर तेवढ्या कालावधीमध्ये झालेली वाढ हा संपूर्ण परतावा आहे. उदाहरणार्थ, आपण 5 वर्षांपूर्वी एका फंडमध्ये रु. 5000 गुंतवले होते. जर आज आपल्या गुंतवणुकीचे मूल्य रु. 6000 असेल, तर आपल्याला रु. 1000 एवढा परतावा मिळाला, म्हणजेच रु. 5000 गुंतवणुकीवर 20%.

संपूर्ण परताव्याचा तोटा असा आहे की यात कालावधीचा विचार केला जात नाही. वरील उदाहरणामध्ये 20% फार चांगला आकडा दिसतो. पण त्यासाठी 5 वर्षे लागली, तर तो खरंच एवढा चांगला आहे? पण जर आपण या 5 वर्षांच्या कालावधीसाठी सरासरी वार्षिक परतावा (सीएजीआर) काढलात, तर तो फक्त 3.7% एवढाच बसेल. फंडमधील एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी परतावा काढण्यासाठी संपूर्ण परतावा वापरला जातो.

इतर सर्व गणनेमध्ये वार्षिकीकृत (अॅन्युअलाइझ्ड) परतावा (सीएजीआर) काढला जातो जो एका विशिष्ट कालावधीसाठी त्या गुंतवणुकीवरील सरासरी वार्षिक परतावा असतो. वरील उदाहरणामध्ये सीएजीआर दाखवा, ज्याने 5 वर्षांमध्ये 20% परतावा फार नाही हे ठळकपणे दिसून येईल.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे