सीएजीआर किंवा वार्षिककीकृत परतावा म्हणजे काय?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

चक्रवाढ वार्षिक वृद्धी दर (सीएजीआर) हा एक सगळीकडे वापरला जाणारे रिटर्न मेट्रिक आहे कारण हा एखाद्या गुंतवणुकीने मिळवलेला वर्ष-दर-वर्ष परतावा दर्शवतो, तर संपूर्ण परताव्यामध्ये फक्त परताव्याची टक्केवारी कळते, त्यात किती कालावधी लागला यावर लक्ष दिले जात नाही. सीएजीआरला जास्त प्राधान्य दिले जाते, कारण याचा उपयोग निरनिराळ्या प्रकाच्या ऐसेट क्लासेसची तुलना करण्यात केला जाऊ शकतो कारण यात मूळ गुंतवणुकीची रक्कम, गुंतवणुकीचे शेवटले मूल्य आणि लागलेला कालावधी या सर्वांच्या आधारे त्या गुंतवणुकीने मिळवलेला सरासरी वार्षिक परतावा काढला जातो. जर रु. 1000 एवढी गुंतवणूक 5 वर्षे आधी केली होती आणि आज तिचे मूल्य रु. 1800 आहे, तर संपूर्ण परतावा 80% असेल, आणि सीएजीआर तो सरासरी परतावा आहे जो त्या गुंतवणुकीने प्रत्येका वर्षी दिला.

अशा परिस्थितीमध्ये सीएजीआर 12.5% आहे. जर आपल्याला याची तुलना 12.5% व्याज देणाऱ्या बँक एफडीशी करायची असेल, तर सीएजीआर मुळे ही तुलना सहज शक्य होते. तसेच, जर आपल्याला आपल्या गुंतवणुकीचा परतावा चलनवाढी शिवाय काढायचा असेल, ज्याचा दर साधारण 4% वार्षिक असतो, तर सीएजीआर मुळे ती गणना करणे सोपे जाते आणि आपल्याला कळते की चलनवाढीचा दर वजा केल्यावर आपला परतावा खरेतर 8.5% होता.

एका वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी परताव्याची तुलना करायची असल्यास सीएजीआर उपयोगी आहे. गुंतवणुकीने काही वर्षांमध्ये 12.5% पेक्षा अधिक परतावा दिला असेल आणि काही वर्षांमध्ये 12.5% पेक्षा कमी परतावा दिला असेल, पण सरासरी प्रमाणे याची वाढ या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये 12.5% वार्षिक या दराने झाली.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे