म्युच्युअल फंड्समधील व्याजाचा दर काय आहे?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

जगात फुकट काहीच मिळत नाही. आपण उपभोग घेत असलेल्या प्रत्येक वस्तू किंवा सेवेसाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात, प्रत्यक्षपणे, किंवा अप्रत्यक्षपणे. उदाहरणार्थ, आपल्याला वाहन ठेवण्यासाठी जागा वापरत असल्याचे पैसे द्यावे लागतात. जेव्हा आपण कुरियर द्वारे काही पाठवता, तेव्हा त्या वस्तूच्या वजनाप्रमाणे आणि पाठवलेल्या ठिकाणाच्या अंतराप्रमाणे पैसे द्यावे लागतात. जेव्हा आपण कोणाकडून पैसे उसने घेता, तेव्हा देणारा आपल्याकडून त्या रकमेसाठी आणि उसने घेण्याच्या कालावधीसाठी काही शुल्क घेतो. हे शुल्क उसने घेतलेल्या रकमेच्या काही टक्क्यांप्रमाणे दर्शवले जाते आणि यालाच व्याजाचा दर म्हणतात, हा साधारणपणे वार्षिक असतो.

कंपनी, बँका आणि सरकार जनतेकडून डेब्ट फंड्सच्या माध्यमातून पैसे उसने घेतात आणि हे भांडवल त्यांच्या व्यवसायात उपयोगी आणतात. या उसन्या घेतलेल्या रकमेवर त्यांना सुद्धा काही शुल्क द्यावे लागते. ते जनतेकडून पैसे घेण्यासाठी बाँड्स जारी करतात आणि त्याचा मोबदला म्हणून बाँड धारकांना एका निश्चित दराने व्याज देतात, म्हणजेच शुल्क देतात, आणि बाँड धारकांसाठी त्यांच्या पैशाच्या गुंतवणुकीचा मोबदला हाच असतो. आपल्या बचत खात्यावर किंवा मुदत ठेवीवर बँक आपल्याला व्याज देते. तसेच, बाँड जारी केल्यावर कंपनी सुद्धा व्याज देते. जेव्हा म्युच्युअल फंड्स हे बाँड त्यांच्या पोर्टफोलिओसाठी विकत घेतात, तेव्हा त्यांचे उत्पन्न हे या व्याजाच्या रूपात असते. बाँडच्या किंमती व्याज दराशी व्यस्त प्रमाणात संबंधित असतात, म्हणजे हे दोन्ही आकडे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालतात.

452
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे