ओपन-एंडेड म्युच्युअल फंडस् आणि क्लोज-एंडेड म्युच्युअल फंडस् म्हणजे काय?

ओपन-एंडेड म्युच्युअल फंडस् आणि क्लोज-एंडेड म्युच्युअल फंडस् म्हणजे काय? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंडांचे वर्गीकरण ओपन-एंडेड म्युच्युअल फंडस् आणि क्लोज-एंडेड म्युच्युअल फंडांमध्ये केले जाऊ शकते. पण दोघांमध्ये काय फरक आहे? आपण शोधून काढू या.

1)    ते काय आहेत?

ओपन-एंडेड म्युच्युअल फंडस् म्हणजे काय?
ओपन-एंडेड म्युच्युअल फंडस् ही गुंतवणुकीची एक श्रेणी आहे जी गुंतवणूकदारांना कधीही युनिट्स खरेदी आणि विक्री करू देते. एकदा न्यू फंड ऑफर संपली की, फंड काही दिवसात गुंतवणूक स्वीकारण्यास सुरुवात करतो. त्यामुळे गुंतवणूकदार स्कीम इन्फर्मेशन डॉक्युमेंटनुसार स्कीमच्या युनिट्समध्ये कधीही गुंतवणूक करू शकतात. 


क्लोज-एंडेड म्युच्युअल फंडस् म्हणजे काय?

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) यांच्यानुसार क्लोज-एंडेड म्युच्युअल फंड म्हणजे असे फंडस जे ठराविक मुदतीसाठी असतात किंवा त्यांना मॅच्युरीटी डेट असते. हे म्युच्युअल फंडस् स्कीम सुरू झाल्यावर विशिष्ट कालावधीसाठी सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध असतात आणि गुंतवणूक कालावधीच्या शेवटी रिडीम केले जाऊ शकतात.


2)    ते कसे कार्य करतात?

ओपन-एंडेड म्युच्युअल फंडस् 

सर्व म्युच्युअल फंडस् प्रथम न्यू फंड ऑफर (एनएफओ) द्वारे बाजारात आणले जातात. सहसा, एनएफओ जास्तीत जास्त 15 दिवसांसाठी खुला असतो. एकदा एनएफओ तयार झाला की, तुम्ही ओपन-एंडेड म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकता.

जेव्हा तुम्ही ओपन-एंडेड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही नेट अ‍ॅसेट व्हॅल्यूवर युनिट्सची खरेदी किंवा विक्री करणे आवश्यक असते. एनएव्ही हे फंडाने ज्यात गुंतवणूक केली आहे अशा सर्व सिक्युरिटीजचे बाजार मूल्य असते. सिक्युरिटीजच्या बाजार मूल्यावर अवलंबून एनएव्हीमध्ये दररोज चढ-उतार होत असते. हे म्युच्युअल फंडस् किती युनिट्स फ्लोट करू शकतात यावर कोणतीही मर्यादा नसते किंवा मॅच्युरिटी कालावधी नसतो.

ओपन-एंडेड म्युच्युअल फंडस् प्रोफेशनल फंड मॅनेजर्सद्वारे व्यवस्थापित केले जातात जे फंडाच्या उद्दिष्टांवर आधारित गुंतवणूकीचे निर्णय घेतात आणि दस्तऐवज देतात. स्कीम इन्फर्मेशन डॉक्युमेंटनुसार तुम्ही या फंडांमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIPs), एकरकमी (Lumpsum) किंवा सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन्स (STPs) द्वारे गुंतवणूक करू शकता.

क्लोज-एंडेड म्युच्युअल फंडस्

न्यू फंड ऑफर (एनएफओ) ही मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांनी (एएमसी) सुरू केलेल्या नवीन स्कीमसाठी प्रथमच ऑफर केलेली सदस्यता असते. क्लोज-एंडेड फंडांसाठीही हेच आहे. एकदा एनएफओ लाँच झाला की, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाची युनिट्स एका ठराविक किंमतीला खरेदी करू शकतात. एकदा एनएफओ संपल्यावर नवीन गुंतवणूकदार या फंडात गुंतवणूक करू शकत नाहीत. तथापि, एएमसी नंतर म्युच्युअल फंडाला गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यासाठी स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध करू शकते. 

एक गुंतवणूकदार म्हणून, तुम्ही मुदतपूर्ती होईपर्यंत गुंतवणूक ठेवण्याची निवड करू शकता, जेव्हा फंडाचे लिक्विडेशन करण्यात येईल आणि तुम्हाला एनएव्ही दिला जाईल. वैकल्पिकरित्या, तुम्हाला निधीची तातडीची गरज असल्यास, स्कीम इन्फर्मेशन डॉक्युमेंटनुसार तुम्ही तुमचे युनिट्स दुय्यम बाजारात विकू शकता क्लोज्ड-एंडेड फंड्स फंड मॅनेजर्सना पैसे बाहेर जाण्याच्या भीतीशिवाय फंड्सचे वाटप करण्याची फ्लेक्सिबिलिटी प्रदान करतात.

3)    त्यांचे फायदे काय आहेत? 

ओपन-एंडेड म्युच्युअल फंडांचे फायदे

जर तुम्ही ओपन-एंडेड म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला माहित असले पाहिजे असे फायदे येथे दिले आहेत:

1.  लिक्विडिटी 
ओपन-एंडेड म्युच्युअल फंड हे लिक्विड असतात कारण तुम्ही कोणत्याही कामाच्या दिवशी युनिट्स खरेदी आणि विक्री करू शकता. तुम्ही तुमच्या गुंतवणूकीचे रुपांतर रोखीत कधी करू शकता यावर कोणतेही निर्बंध नाहीत. 

2. पारदर्शकता 
ओपन-एंडेड म्युच्युअल फंड त्यांच्या रेकॉर्डच्या बाबतीत अत्यंत पारदर्शक असतात. इतर गोष्टींबरोबरच ते कोणत्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात, त्यांचा मागील कामगिरीचा इतिहास आणि फंड मॅनेजरची कामगिरी तुम्ही पाहू शकता. यामुळे तुम्हाला गुंतवणुकीचा निर्णय घेणे सोपे जाते. तथापि, भूतकाळातील कामगिरी भविष्यातील कामगिरीची हमी देत नसल्यामुळे, आपल्या गुंतवणुकीचे नियमितपणे पुनरावलोकन करणे आणि ट्रॅक ठेवणे महत्त्वाचे असते.

3.  सिस्टेमॅटिक पर्याय 
तुम्ही एकरकमी, एसआयपी किंवा एसटीपी द्वारे ओपन-एंडेड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. या पर्यायांमुळे तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करणे तुमच्यासाठी सोयीचे होते. 

4. व्यावसायिक व्यवस्थापन 
ओपन-एंडेड म्युच्युअल फंड हे प्रोफेशनल फंड मॅनेजर्सद्वारे व्यवस्थापित केले जातात, ज्या व्यक्ती स्वतःचा पोर्टफोलिओ सक्रियरीत्या व्यवस्थापित करू शकत नाहीत त्यांच्यासाठी ते आदर्श बनवतात. फंड मॅनेजर बाजारातील परिस्थिती, संशोधन आणि स्कीम ऑफर डॉक्युमेंटच्या आधारे गुंतवणुकीचे निर्णय घेतात, ज्यामुळे तुमचा नेहमी बाजारावर लक्ष ठेवण्याचा त्रास वाचतो. 

क्लोज-एंडेड म्युच्युअल फंडाचे फायदे

ओपन-एंडेड म्युच्युअल फंड सुलभ रोखता, गुंतवणुकींमधील पारदर्शकता आणि लवचिकता यासारखे फायदे देतात, तर क्लोज-एंडेड म्युच्युअल फंडांचे देखील फायदे असतात.

1. स्थिरता
क्लोज-एंडेड म्युच्युअल फंड अधिक स्थिर मानले जातात कारण एकदा एनएफओ संपला की ते रद्द केले जाऊ शकत नाहीत. हे वैशिष्ट्य फंड व्यवस्थापकांना एक स्थिर ॲसेट बेस देते, ज्यातून ते योग्य गुंतवणूक धोरणे तयार करू शकतात. लिक्विडिटी राखणे देखील सोपे आहे कारण मॅच्युरिटीपर्यंत कोणतेही/किमान रिडम्शन नसतात.

2. मोठ्या प्रवाहापासून सुरक्षितता 
क्लोज-एंडेड म्युच्युअल फंडांना लाभलेला आणखी एक फायदा म्हणजे फंडाच्या मूल्यामध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण विचलन होत नाही कारण लॉक-इन कालावधीत कोणताही इन- फ्लो किंवा आउट-फ्लो नसतो. याचा सकारात्मक फायदा पाहा – फंड मॅनेजर त्यांच्या गुंतवणूकीच्या धोरणांना किमान रिडम्शन प्रेशरमुळे धरून ठेवू शकतात

3. व्यावसायिकरित्या व्यवस्थापित
क्लोज-एंडेड म्युच्युअल फंड देखील प्रोफेशनल फंड मॅनेजर्सद्वारे व्यवस्थापित केले जातात. लॉक-इन कालावधी लक्षात घेता, फंड मॅनेजर्स रोकड सुलभता व्यवस्थापित करण्यात अडकण्याऐवजी फंडाची कार्यक्षमता वाढवणारी गुंतवणूक धोरणे आखू शकतात. विषय आणि स्पष्टीकरण यातील फरक.

ओपन-एंडेड आणि क्लोज-एंडेड म्युच्युअल फंड यांच्यातील निवड कशी करावी? 

ओपन-एंडेड आणि क्लोज-एंडेड म्युच्युअल फंडांमधील निवड करताना, आपल्याला अनेक घटकांचा विचार करणे आवश्यक आहे: 

1. लिक्विडिटी
ओपन-एंडेड म्युच्युअल फंड अधिक तरल असतात कारण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कधीही युनिट्स खरेदी आणि विक्री करू शकता. क्लोज-एंडेड म्युच्युअल फंड एक्सचेंजवर विकले जाऊ शकतात, परंतु ओपन-एंडेड म्युच्युअल फंडांइतकी लिक्विडिटी असू शकत नाही. 

2.  फी 
ओपन-एंडेड म्युच्युअल फंडांची किंमत जास्त असू शकते आणि त्यांची फी जास्त असू शकते. क्लोज-एंडेड म्युच्युअल फंडांची फी कमी असते. हे तुमच्यासाठी एक महत्त्वाचा घटक असल्यास, गुंतवणूक करण्यापूर्वी फीजची तुलना करण्याचे सुनिश्चित करा. 

3. गुंतवणूक कालावधी;
ओपन-एंडेड म्युच्युअल फंडांसाठी गुंतवणुकीचा कालावधी पूर्णपणे गुंतवणूकदारांच्या पसंतीवर आणि आर्थिक उद्दिष्टांवर अवलंबून असतो. क्लोज-एंडेड म्युच्युअल फंड अशा गुंतवणूकदारांसाठी योग्य असू शकतात ज्यांची विशिष्ट उद्दिष्टे आहेत आणि ते अल्पावधीत विकू शकतात.

4. फ्लेक्सिबिलिटी 
तुम्ही ओपन-एंडेड म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणुकीद्वारे किंवा एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकता. तथापि, क्लोज-एंडेड म्युच्युअल फंडांमध्ये मर्यादित गुंतवणूक वेळ असल्याने, तुम्ही त्यात एसआयपी द्वारे गुंतवणूक करू शकत नाही. फक्त एकरकमी गुंतवणुकीला परवानगी असते. 

म्हणूनच, जर तुम्हाला गुंतवणुकीची अधिक लवचिकता, उच्च रोकड सुलभता हवी असेल तर ओपन एंडेड म्युच्युअल फंड तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. नेहमीप्रमाणे, कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमचे संशोधन केले आहे, तुमची गुंतवणूक उद्दिष्टे आणि रिस्क प्रोफाइल समजून घेतली आहे याची खात्री करा. स्कीमचे रिस्क-ओ-मीटर तपासा, जे तुम्हाला म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजारातील इतर योजनांच्या तुलनेत किती जोखमीचे आहे हे सांगते. बेंचमार्क रिस्क-ओ-मीटर तपासणे आणि तुम्ही विचार करत असलेल्या गुंतवणुकीशी त्याची तुलना करणे देखील उपयुक्त ठरेल. हे तुम्हाला अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करेल. 

तुम्ही ओपन-एंडेड म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करत असो किंवा क्लोज-एंडेड, तुम्ही स्कीम-संबंधित ऑफर डॉक्युमेंट वाचल्याची खात्री करा. तुम्हाला काही स्पष्टीकरण हवे असल्यास तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.  

अस्वीकरण

एएमएफआय म्युच्युअल फंड योजनांच्या विविध प्रवर्गांबद्दलची वेबसाइटवर वितरित माहिती देण्याच्या हेतुकरिता, म्युच्युअल फंड्सविषयी एक वित्तीय उत्पादन प्रवर्ग म्हणून जागृती निर्माण करण्यासाठी आहे आणि कोणत्याही विक्री प्रचारासाठी नाही किंवा व्यवसायाच्या शिफारससाठी नाही. 

येथे दिलेला मजकूर एएमएफआय द्वारे जाहीररीत्या उपलब्ध माहितीच्या, अंतर्गत स्रोतांच्या आणि इतर त्रयस्थ स्रोतांच्या आधारे तयार करण्यात आला असून विश्वसनीय मानला जातो. परंतु, अशा माहितीच्या अचूकतेविषयी एएमएफआय हमी देऊ शकत नाही, तिच्या पूर्णत्वाविषयी आश्वासन देऊ शकत नाही किंवा ही माहिती बदलणार नाही असे वचन देऊ शकत नाही. 

सदर मजकूर वैयक्तिक गुंतवणूकदाराची उद्दिष्टे, जोखीम पत्करण्याची क्षमता किंवा आर्थिक गरजा किंवा परिस्थिती किंवा येथे वर्णिलेल्या म्युच्युअल फंड उत्पादनांची अनुकूलता विचारात घेत नाही. म्हणूनच, गुंतवणूकदारांना आम्ही सल्ला देतो की त्यांनी त्यांच्या व्यावसायिक गुंतवणूकदार सल्लागारांचा / समुपदेशकांचा / कर सल्लागारांचा ह्या संदर्भात गुंतवणुकीसाठीचा सल्ला घ्यावा. 

म्युच्युअल फंड योजना ही ठेव योजना नसते आणि म्युच्युअल फंडद्वारे किंवा त्याच्या एएमसीद्वारे तशा बंधनकृत, हमीकृत किंवा विमेकृत नसते. त्यामध्ये अंतर्भूत गुंतवणुकांच्या स्वरूपामुळे, म्युच्युअल फंडमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची किंवा संभाव्य उत्पन्नाची हमी देता येत नाही. ऐतिहासिक कामगिरी जेव्हा सादर होते तेव्हा ती फक्त संदर्भाच्या हेतुकरिता असते आणि भावी परिणामांची हमी नसते.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.
 

285
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे