ओव्हरनाइट फंड म्हणजे काय?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

सर्व म्युच्युअल फंडांमध्ये ओव्हरनाइट फंड सर्वात सुरक्षित समजले जातात. जर आपण म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे सुरू करीत असाल आणि नंतर आपल्याला संपूर्ण गुंतवणूक करायची असेल तर ओव्हरनाइट फंड आपल्यासाठीच आहेत. 

ओव्हरनाइट फंड एक प्रकारच्या ओपन  एंडेड  डेब्ट स्किमसारखे असतात जे दुसऱ्या दिवशी पूर्ण होणाऱ्या डेब्ट रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात. म्हणजेच, यातील रोख्यांचे पैसे दररोज फंडला मिळत जातात आणि फंड व्यवस्थापक त्या पैशाने असे नवीन रोखे पोर्टफोलिओसाठी खरेदी करतात ज्यांची पूर्तता लगेच दुसऱ्या दिवशी होणार असते. या फंडांतील रोख्यांची पूर्तता दुसऱ्या दिवशीच होणार असल्यामुळे, या फंडांमध्ये व्याज दराचा जोखीम किंवा कर्जाच्या परतफेडीमध्ये कसूर होण्याचा जोखीम इतर डेब्ट फंडांपेक्षा फारच कमी असतो. जोखमीचे स्वरूप अशा प्रकारे कमी असल्यामुळे त्यांतील परतावा सुद्धा सर्वात कमी असतो.

ओव्हरनाइट फंड अशा व्यवसायिकांसाठी किंवा उद्योजकांसाठी योग्य आहेत ज्यांना फार कमी कालावधीसाठी मोठी रक्कम ठेवायची असते आणि ती रक्कम ते नंतर इतरत्र कुठेतरी गुंतवतात. बँकेतील करंट खात्यामध्ये पैसे निष्क्रिय पडून राहण्यापेक्षा काही दिवसांसाठीच का असेना, ओव्हरनाइट फंडमध्ये आपले शिल्लक पैसे गुंतवून त्यावर काही प्रमाणात परतावा मिळवणे अधिक चांगले. जर आपल्याला आणीबाणीसाठी काही पैसे वेगळे ठेवायचे असतील तर हे फंड आपत्कालीन फंड तयार करण्यासाठी सुद्धा आदर्श आहेत. आपली गुंतवणूक लगेच उपलब्ध असून काही परतावा सुद्धा मिळवू शकते कारण या फंडांमध्ये रक्कम लगेच मिळण्याची सोय सर्वात अधिक असते.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे