म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करताना लोक कशा प्रकारच्या चुका करतात?
नवीन गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड्स
मूलभूत माहिती
43 सेकंद वाचण्यासाठी

सर्वच गुंतवणुकींमध्ये गुंतवणूक करताना चुका होऊ शकतात, आणि म्युच्युअल फंड्स याला अपवाद नाहीत.
म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करताना होणाऱ्या काही सामान्य चुका पुढीलप्रमाणे:
- उत्पादन नीट समजून न घेता गुंतवणूक करणे: उदाहरणार्थ, इक्विटी फंड्स हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी केला जातो, पण गुंतवणूकदारांना अल्पमुदतीमध्ये सहज चांगला परतावा हवा असतो.
- जोखमीतील घटक जाणून न घेता गुंतवणूक करणे: सर्व म्युच्युअल फंड स्किम्समध्ये काही जोखमीचे घटक असतातच. गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक करण्याआधी ते समजून घेतले पाहिजेत.
- योग्य रकमेची गुंतवणूक न करणे: काही वेळा लोक निष्काळजीपणे गुंतवणूक करतात, त्यासाठी त्यांचे काही नियोजन किंवा उद्दिष्ट नसते. अशा वेळी, केलेल्या गुंतवणुकीचा योग्य परिणाम साधला जात नाही.
- फार लवकर रोख रकमेत रुपांतरीत करुन घेणे: काही वेळा गुंतवणूकदारांचा धीर सुटतो किंवा ते एखाद्या गुंतवणुकीला परतावा देण्यासाठी आवश्यक वेळ देत नाहीत आणि वेळेआधीत रोख रकमेत त्याचे रुपांतर करुन घेतात.
- कळपाप्रमाणे वागणे: अनेकदा गुंतवणूकदार स्वतःची विवेकबुद्धी वापरत नाहीत आणि 'बाजार’ किंवा 'मीडिया’ मधील अफवा ऐकून वाहावत जातात, आणि त्यामुळे चुकीची निवड करतात.
- नियोजन न करता गुंतवणूक करणे: ही बहुधा सर्वात मोठी चूक ठरते. गुंतवलेल्या प्रत्येक रुपया मागे नियोजन आणि उद्दिष्ट असणे गरजेचे आहे.