आपण दिर्घकालीन गुंतवणूक केलेली असेल आणि मधल्या काळात जर बाजार पडला तर काय होईल?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

एसआयपीच्या माध्यमाने दिर्घकालीन गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड गुंतवणूकदार नेहमी बाजार पडला तर काय होईल ह्या चिंतेत असतात. बाजाराची वेळ आणि अस्थिरता या सारख्या म्युच्युअल फंड्समधील काही जोखमींवर मात करण्यासाठी एसआयपी उत्तमप्रकारे काम करतात. 

आपण एसआयपीच्या माध्यमाने म्युच्युअल फंडमध्ये नियमितपणे गुंतवणूक करून बाजारातील चढ-उतारांवर खर्चाच्या सरासरीच्या नियमाने मात करू शकता. जेव्हा एनएव्ही कमी असते तेव्हा आपण अधिक युनिट्स खरेदी करता आणि तसेच ह्याच्या उलट सुद्धा होते. जर एनएव्हीमध्ये चढ-उतार होत असले तर दीर्घकालामध्ये प्रत्येक युनिटचा भाव सरासरीप्रमाणे असतो. उदाहरणार्थ, जर आपण दर महिन्याला रु. 1,000/- गुंतवले, तर एनएव्ही रु. 10 असताना आपल्याला 100 युनिट मिळतील आणि एनएव्ही रु. 5 वर आल्यावर आपल्याला 200 युनिट मिळतील. दीर्घकालामध्ये जर बाजारामध्ये चढ आणि उतार दोन्ही होत राहिले तर प्रत्येक युनिटमागचा सरासरी दर कमी होईल आणि त्याने परताव्यातील चढ-उतार सुद्धा कमी होईल. 

जर आपण एकरकमी गुंतवणूक केलीत, तर गुंतवणुकीच्या संपूर्ण कालावधीमध्ये युनिटची संख्या स्थिर राहील, पण बाजार पडल्यावर एनएव्ही कमी होईल आणि आपल्या गुंतवणुकीचे मूल्य सुद्धा कमी होईल. जर आपण एखाद्या इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये एकरकमी गुंतवणूक करून दिर्घकालासाठी ठेवलीत (उदाहरणार्थ, 7-8 वर्षांसाठी), तर अधून-मधून कमी झालेल्या एनएव्हीमुळे आपल्या एकूण परताव्यावर फारसा फरक पडणार नाही कारण दीर्घकालामध्ये बाजार साधारणपणे चढत असतो. सुरुवातीला आपण ज्या एनएव्हीवर गुंतवणूक केली असेल, शेवटी त्यापेक्षा कदाचित एनएव्हीचे मूल्य अधिकझालेले असेल.

452
475
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे