म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांना कशा प्रकारच्या जोखमींना सामोरे जावे लागते?

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांना कशा प्रकारच्या जोखमींना सामोरे जावे लागते?

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंड निरनिराळ्या बाजारांमध्ये खरेदी-विक्री केल्या जाणाऱ्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात, जसे स्टॉक, बाँड, सोने किंवा इतर प्रकारच्या मालमत्ता. अशी खरेदी-विक्री केले जाऊ शकणारे कुठलेही रोखे बाजाराच्या जोखमीच्या अधीन असतात, म्हणजे बाजाराच्या चढ-उताराप्रमाणे त्या रोख्याची किंमत कमी-अधिक होण्याची शक्यता असते.

व्याज दरातील बदलांमुळे बाँडच्या किंमतीवर प्रभाव पडतो आणि त्यामुळे डेब्ट फंडच्या एनएव्हीवर सुद्धा. त्यामुळे, डेब्ट फंड मध्ये व्याज दराचा जोखीम सर्वात अधिक असतो. तसेच, त्यांत क्रेडिट जोखीम सुद्धा असतो (बाँड जारी करणाऱ्या संस्थेने पैसे नाही दिल्याचा जोखीम). काही मिळकत-उन्मुख डेब्ट फंडमध्ये चलनवाढीचा जोखीम सुद्धा असतो, म्हणजे त्यांनी दिलेला परतावा चलनवाढीपेक्षा कमी असण्याची शक्यता असते. इक्विटी फंड मध्ये बाजाराचा जोखीम असतो कारण ते बाजारात खरेदी-विक्री केल्या जाणाऱ्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात आणि स्टॉकच्या किंमतीतील चढ-उतारांमुळे या फंडच्या एनएव्हीवर प्रभाव पडतो. काही रोख्यांची बाजारात अधिक प्रमाणात खरेदी-विक्री होते आणि काहींची होत नाही.

जर एखाद्या फंडने आपला पैसा अशा रोख्यांमध्ये गुंतवला असेल ज्यांचे चलन बाजारात फारसे नाही, तर तो फंड त्या रोख्यांना योग्य वेळी चांगल्या दराने विकण्यात यशस्वी होईलच असे सांगता येत नाही. याला लिक्विडिटीचा जोखीम असे म्हणतात आणि याने फंडच्या पोर्टफोलिओमधील व्यवहारांवरील खर्च वाढतो, ज्याने आपल्या फंडच्या एनएव्हीवर प्रभाव पडतो.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे