अनेक लोकांना म्युच्युअल फंड फार गुंतागुतीचे किंवा भीतीदायक वाटू शकतात. आम्ही आपल्याला हा विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. विशेषतः, म्युच्युअल फंडमध्ये पुष्कळ लोकांचा (म्हणजे गुंतवणूकदारांचा) पैसा एकत्र आणला जातो. या निधीचे व्यवस्थापन प्रोफेशनल फंड व्यवस्थापक करतात.
ही एक व्यवस्था आहे जी, ज्यांची गुंतवणुकीची उद्दिष्टे समान अशा अनेक गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करण्याचे काम करते. नंतर ही व्यवस्था त्या पैशाला इक्विटी, बाँड, रोखे बाजारातील उपकरणे आणि/ किंवा इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवते. प्रत्येक गुंतवणूकदाराला युनिट्स दिले जातात, हे युनिट्स त्या निधीतील त्यांचा भागाचे प्रतिनिधित्व करत असतात. स्किमच्या "नेट अॅसेट व्हॅल्यू किंवा एनएव्ही" ची गणना करून त्यातून खर्चांसाठी काही भाग वजा करून, या एकत्रित निधीतून झालेला लाभ/ मिळकत सर्व गुंतवणूकदारांमध्ये त्यांच्या गुंतवणुकीच्या अनुपाताने वाटली जाते. थोडक्यात सांगायचे झाले, तर म्युच्युअल फंड सामान्य माणसासाठी सर्वात योग्य अशी गुंतवणूक आहे कारण यात विविध क्षेत्रांमध्ये, व्यावसायिक व्यवस्थापन केलेल्या अनेकविध सिक्युरिटीजमध्ये, कमी खर्चात गुंतवणूक करण्याची संधी मिळते.
म्युच्युअल फंड कसे काम करते?
म्युच्युअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्र करून स्कीम ऑफर दस्तऐवजांनुसार विविध प्रकारच्या सिक्युरिटीज पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करणे. चला, म्युच्युअल फंड कसे काम करते हे समजून घेऊया.
गुंतवणूकदार जेव्हा युनिट्सच्या स्वरूपात म्युच्युअल फंड स्कीममध्ये पैसे गुंतवतात तेव्हा फंडचे एकत्रीकरण होते. प्रत्येक युनिट फंड आणि त्याच्या अंतर्गत मालमत्तेमध्ये सममूल्य हक्काचे प्रतिनिधित्व करते. फंडाचा उद्देश एक विशिष्ट गुंतवणूक धोरणाला अनुसरण करणे आणि फंड कोणत्या प्रकारच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करेल हे ठरवणे आणि ते बाजारातील जोखमींच्या अधीन आहे.
म्युच्युअल फंड स्कीम सामान्यतः विविध प्रकारच्या सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करतात ज्यामुळे जोखमीचे विभाजन होते. फंड मॅनेजर सक्रियपणे पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करतो आणि त्याच्या संशोधन व विश्लेषणाच्या आधारावर सिक्युरिटीज खरेदी, होल्डिंग किंवा विक्रीचे निर्णय घेतो. पॅसीव्ह म्युच्युअल फंड बाजाराच्या निर्देशांकाच्या कामगिरी सारखी कामगिरी करतात जेणेकरून जास्तीत जास्त परतावा मिळवता येईल. पॅसीव्ह फंडाचे पोर्टफोलिओ, निफ्टी किंवा सेन्सेक्स सारख्या निर्दिष्ट बाजार निर्देशांकाची नक्कल करतात, जिथे गुंतवणुकीची रचना आणि प्रमाण ट्रॅक केलेल्या निर्देशांकाशी जुळते, आणि ते ट्रॅकिंग त्रुटीच्या अधीन आहे.
म्युच्युअल फंड्सची वैशिष्ट्ये आणि फायदे
म्युच्युअल फंड्सची वैशिष्ट्ये आणि फायदे पुढील प्रमाणे आहेत:
1. प्रोफेशनलद्वारे व्यवस्थापन: म्युच्युअल फंड्स हे तज्ञ प्रोफेशनलद्वारे व्यवस्थापित केले जातात जे रिसर्चच्या आधारे ज्ञातपूर्वक गुंतवणुकीचे निर्णय घेतात.
2. म्युच्युअल फंड्स लिक्विड स्वरूपाचे असतात: गुंतवणूकदार कोणत्याही कामकाजाच्या दिवशी फंडाच्या लागू असलेल्या नेट अॅसेट व्हॅल्यू (NAV) वर म्युच्युअल फंड युनिट खरेदी किंवा विक्री करू शकतात.
3. फंडाचे विविध प्रकार: विविध गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि जोखमीच्या सहनशक्तीला अनुरूप विविध प्रकारचे म्युच्युअल फंड्स उपलब्ध आहेत, जसे की, इक्विटी स्कीम, डेट स्कीम, हायब्रीड स्कीम, सोल्यूशन ओरिएंटेड स्कीम आणि इतर स्कीम.
4. स्वयंचलित गुंतवणूक: सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग मोडद्वारे म्युच्युअल फंड्स नियमित अंतराने स्वयंचलितपणे गुंतवणूक करण्याचा पर्याय देतात. यामुळे गुंतवणूकदारांना रूपी कॉस्ट एव्हरेजिंगचा फायदा मिळतो आणि दीर्घ काळात चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळतो.
[इतर सुविधांमध्ये सिस्टेमॅटिक विथड्रॉल प्लॅन, सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लॅन उपलब्ध आहेत.]
5. म्युच्युअल फंड विविधीकरण देतात: संसाधनांचे एकत्रीकरण करून, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना विविध प्रकारच्या सुरक्षा पोर्टफोलिओचा अनुभव देतात. यामुळे एखाद्या गुंतवणुकीच्या खराब कामगिरीचा परिणाम कमी होतो.
6. सुविधाजनक: म्युच्युअल फंड खरेदी, विक्री आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापनाच्या प्रक्रियेला सुलभ बनवतात, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा वेळ आणि मेहनत वाचते.
7. म्युच्युअल फंड्स ही किफायतशीर गुंतवणूक आहे: म्युच्युअल फंड्स लहान गुंतवणूकदारांना मर्यादित भांडवलानेही विविध पोर्टफोलिओमध्ये प्रवेश मिळविण्यास सक्षम करतात.
8. कर लाभ: काही म्युच्युअल फंड्स कर लाभ देण्यासाठी तयार केले जातात, जे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकतात. उदाहरणार्थ, ELSS स्कीम्स, जे लॉक-इन कालावधीच्या अधीन कर लाभ देतात..
9. नियमन केलेले वातावरण: म्युच्युअल फंड्स SEBI च्या नियामक देखरेखीखाली येतात जे गुंतवणूकदारांचे संरक्षण करतात आणि गुंतवणूकदारांच्या हितसंबंधांची खात्री करतात.
10. स्कोर्स: स्कोर्स हे SEBI द्वारे प्रदान केलेले ऑनलाइन तक्रार निवारण सुविधा प्लॅटफॉर्म आहे. तक्रारदार म्युच्युअल फंड्सशी संबंधित तक्रारी नोंदवू शकतात.
म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक कशी करावी?
म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक कशी करावी याची क्रमवार माहिती:
स्टेप 1: तुमचे आर्थिक लक्ष्य आणि जोखीम घेण्याची क्षमता ठरवा
तुमच्या गुंतवणुकीचे कारण आणि उद्दिष्ट ठरवा. तुम्ही किती जोखीम घेऊ शकता याचा विचार करा
स्टेप 2: म्युच्युअल फंड्सचे विविध प्रकार समजून घ्या
विविध गरजा भागवण्यासाठी विविध प्रकारचे म्युच्युअल फंड्स आहेत जे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. येथे तुमच्या टाइम हॉरिझन उद्दिष्टे, जोखीम प्रोफाइल इत्यादीवर आधारित तुम्ही गुंतवणूक करू शकता असे काही म्युच्युअल फंड्स दिले आहेत:
● इक्विटी स्कीम्स
● डेट स्कीम्स
● हायब्रीड स्कीम्स
● सोल्यूशन ओरिएंटेड स्कीम्स
● इतर स्कीम्स
स्टेप 3: तुमच्या गुंतवणुकीसाठी एक प्लॅटफॉर्म निवडा
तुम्ही म्युच्युअल फंड युनिट्स थेट म्युच्युअल फंडकडून डायरेक्ट प्लॅन अंतर्गत खरेदी करू शकता. दुसरीकडे, म्युच्युअल फंड युनिट्स रेग्युलर प्लॅन अंतर्गत म्युच्युअल फंड वितरकांकडूनही खरेदी केल्या जाऊ शकतात.
स्टेप 4: प्लॅटफॉर्म वर खाते उघडा
तुमच्याकडे आधीपासूनच नसल्यास, निवडलेल्या म्युच्युअल फंड किंवा प्लॅटफॉर्मवर एक खाते उघडा.
स्टेप 5: म्युच्युअल फंड युनिट्स खरेदी करा
तुम्ही ज्या फंडमध्ये गुंतवणूक करू इच्छिता तो फंड निवडा आणि निवडलेल्या वितरक/प्लॅटफॉर्मद्वारे तुमची ऑर्डर ठेवा.
ऑफर दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा आणि शंका असल्यास तुमच्या आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधा.
स्टेप 6: तुमच्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवा
तुमची गुंतवणूक तुमच्या उद्दिष्टानुसार कामगिरी करत आहे का हे पाहण्यासाठी त्यावर लक्ष ठेवा.
स्टेप 7: आवश्यक असल्यास तुमच्या गुंतवणुकीत बदल करा
लाभांश आणि भांडवली लाभ पुन्हा गुंतवायचा की ते रोख स्वरूपात घ्यायचे हे ठरवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बाजारातील ट्रेंड आणि आर्थिक परिस्थितीबद्दल माहिती ठेवा. विशिष्ट कालावधीसाठी तुमच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे परतावे किती असेल हे तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास, तुम्ही म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर वापरू शकता.
स्टेप 8: कराच्या परिणामांचा विचार करा
भांडवली लाभाच्या कर परिणामांविषयी माहिती ठेवा.
मी म्युच्युअल फंडमधून पैसे काढू शकतो का?
होय, तुम्ही म्युच्युअल फंडमधून पैसे काढू शकता, परंतु प्रक्रिया आणि परिणाम तुमच्या म्युच्युअल फंडच्या प्रकारावर, तुमच्या गुंतवणुकीच्या अटींवर आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर अवलंबून असतात.
म्युच्युअल फंड्सवरील कर परिणाम
म्युच्युअल फंड्सच्या उत्पन्नावर सामान्यत: दोन प्रकारे कर लावला जातो:
a) लाभांश:- लाभांशवर कर तुमच्या कर स्लॅबनुसार लावला जातो.
b) भांडवली लाभ: भांडवली लाभांवर कर खालील तक्त्याच्या अनुसार लावला जातो:
फंड प्रकार |
शॉर्ट-टर्म भांडवली लाभ |
लाँग-टर्म भांडवली लाभ |
इक्विटी फंड्स |
12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी |
12 महिने आणि त्याहून अधिक कालावधीसाठी |
डेट फंड्स |
नेहमी शॉर्ट-टर्म |
|
हायब्रीड इक्विटी-ओरिएंटेड फंड्स |
12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी |
12 महिने आणि त्याहून अधिक कालावधीसाठी |
हायब्रीड डेट-ओरिएंटेड फंड्स |
नेहमी शॉर्ट-टर्म |
|
निष्कर्ष
म्युच्युअल फंड गुंतवणूक तुम्हाला अनेक फायदे देते आणि सोप्या गुंतवणुकीचा पर्याय आहे. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करता तेव्हा त्यासोबत असलेल्या बाजार जोखमीबद्दलही जागरूक असणे आवश्यक आहे.
अस्वीकरण
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.