डिव्हिडंट पर्याय बदलून ग्रोथ पर्याय निवडताना गुंतवणूकदाराने कसा विचार केला पाहीजे?

डिव्हिडंट पर्याय बदलून ग्रोथ पर्याय निवडताना गुंतवणूकदाराने कसा विचार केला पाहीजे? zoom-icon
म्युच्युअल फंड कैलकुलेटर

म्युच्युअल फंड सही आहे?

समजा, आपण फ्लायइंडिया एयरलाइन्सच्या सकाळी 8 च्या फ्लाइटने जाण्यासाठी बंगलोरपासून चेन्नईपर्यंतचे आरक्षण केले आहे. आपल्या लक्षात आले की केलेले आरक्षण चुकीचे आहे, आणि आपल्याला ते बदलावे लागेल. अशा परिस्थितीमध्ये फ्लायइंडिया आपल्याकडून कशाप्रकारचे शुल्क घेऊ शकेल? बहुधा आपल्याला एयरलाइन, प्रवासाची तारीख, ठिकाण आणि प्रवासी यांच्यात बदल करायचा नसेल तरीही आपल्याला आपला विचार बदलल्यामुळे दंड भरावा लागेल! 

म्युच्युअल फंड्मधील गुंतवणुकीसाठी, एकाच स्किममधील गुंतवणुकीचा पर्याय बदलणे विक्री (भरपाई) सारखेच समजले जाते. त्यामुळे, असा बदल करण्यासाठी आपल्या गुंतवणुकीच्या कालावधीप्रमाणे निर्गमन भार आणि कॅपिटल गेन टॅक्स लागू केला जाऊ शकतो. 

एकाच स्किममधील या दोन पर्यायांचा एनएव्ही निराळा असतो आणि त्यांची काम करण्याची पद्धत सुद्धा निराळी असते. 

  • ग्रोथ पर्यायात फंडाने कमावलेल्या नफ्याची गुंतवणूक पुन्हा फंडामध्ये केली जाते आणि अशाने आपल्याला चक्रवाढीचा फायदा मिळतो आणि हा पर्याय दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी योग्य आहे. 
  • डिव्हिडंट पर्यायात फंडाला झालेला नफा गुंतवणूकदारांमध्ये वितरीत जातो. हा पर्याय निवडण्यामागचे उद्दिष्ट हेच असू शकते की गुंतवणूकदारांना त्यांच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीपासून नियमित मिळकत मिळावी.

जर आपला डिव्हीडंट पर्यायातून ग्रोथ पर्यायय निवडण्याचा विचार असेल किंवा याच्या उलट करण्याची इच्छा असेल, तर त्यासाठी निर्गमन भार किंवा कॅपिटल गेन टॅक्स लागू पडतो आहे का ह्याची खात्री करुन घ्या.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे