Skip to main content

स्मार्ट गुंतवणूक निर्णय घ्या

आमचे कॅल्क्युलेटर वापरून तुमच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरील परताव्याचा अंदाज लावा.

SIP Calculator
एसआयपी (SIP) कॅल्क्युलेटर

तुमच्या मासिक SIP गुंतवणुकीचे भविष्यातील मूल्य अंदाजित करा.

आत्ताच कॅल्क्युलेट करा
goal sip calculator
गोल एसआयपी (SIP) कॅल्क्युलेटर

तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली मासिक SIP गुंतवणूक शोधा.

आत्ताच कॅल्क्युलेट करा
smart goal calculator
स्मार्ट गोल कॅल्क्युलेटर

तुमच्या चालू गुंतवणुकीचा विचार करून SIP किंवा लंपसम रक्कम मोजून तुमची आर्थिक उद्दिष्टे नियोजित करा.

आत्ताच कॅल्क्युलेट करा
inflation calculator
इन्फ्लेशन (महागाई) कॅल्क्युलेटर

तुमच्या सध्याच्या खर्चावर आणि भविष्यातील उद्दिष्टांवर महागाईचा परिणाम मोजा.

आत्ताच कॅल्क्युलेट करा
Cost of delay calculator
विलंब किंमत (कॉस्ट ऑफ डिले) कॅल्क्युलेटर

तुमची गुंतवणूक पुढे ढकलण्याचा विचार करत आहात?
तुमचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या मिळकतीवर होणार्‍या परिणामांचा विचार करा.

आत्ताच कॅल्क्युलेट करा
Lumpsum Investment Calculator
लंपसम (एकरकमी) गुंतवणूक कॅल्क्युलेटर

लंपसम गुंतवणुकीवरील संभाव्य परतावे मोजा.

आत्ताच कॅल्क्युलेट करा
Retirement Planning Calculator
रिटायरमेंट प्लानिंग कॅल्क्युलेटर

तुमच्या खर्चाच्या आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक मासिक गुंतवणुकीच्या आधारे तुमचा रिटायरमेंट निधी अंदाजित करा.

आत्ताच कॅल्क्युलेट करा
Step-Up SIP Calculator
स्टेप-अप SIP कॅल्क्युलेटर

निश्चित टक्केवारीने नियमितपणे SIP वाढविल्यास गुंतवणुकीचे भविष्यातील मूल्य मोजा.

आत्ताच कॅल्क्युलेट करा
Systematic Withdrawal Plan (SWP) Calculator
सिस्टेमॅटिक विदड्रॉल प्लॅन (SWP) कॅल्क्युलेटर

गुंतवणुकीमधून व्याजासह नियमित निश्चित रक्कम काढल्यानंतर अंतिम मूल्य मोजा.

आत्ताच कॅल्क्युलेट करा

कॅल्क्युलेटर वापरण्याचे फायदे

finance-planning
सहज आर्थिक नियोजन
saves-time
वेळेची बचत
easy-to-use
वापरण्यास सोपे
helps-make-informed-decisions
माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत

म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर म्हणजे काय?

म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर हे ऑनलाइन टूल आहे जे तुमच्या गुंतवणुकीवरील परतावा आणि भविष्यातील मूल्य कॅल्क्युलेट करण्यास मदत करते. हे खालील घटकांचा विचार करते: सुरुवातीची गुंतवणूक रक्कम, अपेक्षित परताव्याचा दर, गुंतवणुकीचा कालावधी, गुंतवणुकीचे योगदान किती वेळा केले जाते.
तथापि, म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर हा फक्त गुंतवणुकीच्या वाढीचा एक अंदाज आहे, अचूक परतावा नव्हे.

म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर तुमच्यासाठी कसा उपयुक्त आहे?

म्यूच्युअल फंड्स सही आहे द्वारे दिलेले हे आधुनिक ऑनलाइन कॅल्क्युलेटर विविध प्रकारे तुमच्या मदतीस येतात:
1. गुंतवणूक घटक ठरविण्यास मदत करते: गुंतवणूकदार आपली गुंतवणुकीची रक्कम, कालावधी आणि अपेक्षित परतावा यावर आधारित योग्य निर्णय घेऊ शकतो.
2. भविष्यातील आर्थिक योजना आखण्यास मदत करते: कॅल्क्युलेटरद्वारे मिळालेल्या अंदाजानुसार तुम्ही तुमच्या आर्थिक योजना आखू शकता.

म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर कसे कार्य करते?

म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर हे एक सोपे अल्गोरिदम वापरते जे वापरकर्त्याने दिलेल्या घटकांच्या आधारे परताव्याचा अंदाज लावते.

वापरण्यास सोपे टूल: मॅन्युअल गणनेच्या त्रुटींपासून मुक्त
गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये दोन प्रकारे गुंतवणूक करू शकतो: SIP आणि लम्पसम. हा कॅल्क्युलेटर दोन्ही प्रकारच्या गुंतवणुकीचे अंदाजित भविष्यातील मूल्य तपासण्याची सुविधा प्रदान करतो. 
मात्र, हा कॅल्क्युलेटर तुम्हाला अंदाज देण्यासाठी खालील तीन गोष्टींची माहिती आवश्यक आहे:

  • गुंतवणुकीची रक्कम
  • गुंतवणुकीचा कालावधी
  • अपेक्षित परताव्याचा दर

म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटरद्वारे वापरलेले सूत्र:
a) लम्पसम किंवा एकरकमी गुंतवणुकीसाठी:
भविष्यातील मूल्य = सध्याचे मूल्य (1 + r/100)^n
r = अपेक्षित परताव्याचा दर
n = गुंतवणुकीचा कालावधी

b) SIP गुंतवणूकसाठी:
FV = P [(1+i)^n-1]*(1+i)/i

FV = भविष्यातील मूल्य
P = SIP द्वारे गुंतवलेली मूळ रक्कम
i = परताव्याचा संयुक्त दर
n = गुंतवणुकीचा कालावधी (महिन्यांमध्ये)
r = अपेक्षित परताव्याचा दर

म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर कसे वापरावे?

या म्युच्युअल फंड परतावा कॅल्क्युलेटरचा वापर करण्याचे स्टेप्स पुढीलप्रमाणे आहेत:

स्टेप 1: गुंतवणुकीची रक्कम आणि प्रकार (SIP किंवा लम्पसम) निवडा.
स्टेप 2: गुंतवणुकीचा कालावधी निवडा.
स्टेप 3: अपेक्षित परताव्याचा दर भरा.

म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर वापरण्याचे फायदे

म्युच्युअल फंड परतावा कॅल्क्युलेटर हे एक महत्त्वाचे टूल आहे आणि खालील प्रकारे गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरू शकते:

  1. कंपाउंडिंगच्या शक्तीचा अनुभव घ्या: अधिक काळ गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या परताव्यात कमाल वाढ करू शकता. म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर वापरून मूळ गुंतवणूक आणि वेळोवेळी जमा होणाऱ्या व्याजावर तुम्ही किती कमावू शकता याचा अंदाज लावा.
  2. SIP आणि लम्पसम गुंतवणुकीची तुलना करा: तुम्ही SIPs आणि लम्पसम दोन्ही प्रकारे परतावा कॅल्क्युलेट करू शकता. यामुळे तुम्हाला कोणत्या पद्धतीने गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर आहे हे ठरवता येईल.
  3. मॅन्युअल गणनेतील चुका टाळा: मॅन्युअल गणनांच्या पद्धतीमधून किंवा मानवी त्रुटीमुळे उद्भवणाऱ्या सामान्य चुका कॅल्क्युलेटरच्या वापरामुळे टाळता येतात.
  4. भविष्यातील गुंतवणूक धोरणे आखण्यास मदत: अंदाजावर आधारित भविष्यातील आर्थिक योजना आणि गुंतवणूक धोरण आखण्यात हे कॅल्क्युलेटर तुमची मदत करेल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर हे ऑनलाइन टूल आहे जे तुमच्या गुंतवणुकीच्या रक्कम, कालावधी आणि व्याजदर यासारख्या काही प्राथमिक माहितीच्या आधारे अंदाजित परतावा कॅल्क्युलेट करते.

अस्वीकरण 

कृपया नोंद घ्या की हे कॅल्क्युलेटर केवळ उदाहरणादाखल आहेत आणि ते प्रत्यक्ष परतावे दर्शवत नाहीत. म्युचुअल फंड्‌सवर नियत मिळकतीचा दर(फिक्स्ड रेट ऑफ रिटर्न) मिळत नाही आणि मिळकतीच्या दराचे(रेट ऑफ रिटर्न) अनुमान लावणे अशक्य असते. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.