पैसे वाया घालवू नका. ते वाढवा!

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंडमधील वेगवेगळ्या स्किम्समधून वेगवेगळ्या प्रकारचे परतावे मिळतात का?

“म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक का करावी?
आपण बरेचदा म्युच्युअल फंडच्या खराब प्रदर्शनाबद्दल ऐकत असतो. आणि म्युच्युअल फंड खात्रीशीर नाहीत असेही ऐकत असतो. ह्या मर्यादांचा विचार करता, असे कोणते कारण आहे की एखाद्या व्यक्तीने म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहीजे? ते खरचं त्यांचा काही उपयोग आहे का?”

तर, अशा प्रकारचे प्रश्न बरेचदा, विद्यमान आणि भावी म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांकडून विचारले जातात.

ब-याचवेळा प्रश्न जरी एकच विचारला जात असला तरी त्या प्रश्नाचे मूळ, असा प्रश्न का विचारला जात आहे त्याची कारणे व्यक्ती सापेक्ष वेगवेगळी असू शकतात.

काही परिस्थितीमध्ये, गुंतवणुकदार विचार करतो की त्याने गुंतवणुक केलेल्या स्किममधून त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला परतावा मिळत नाहीये. पण,जेव्हा नीट विचार केला जातो तेव्हा असे लक्षात येते की तो दोन अतिशय विभिन्न प्रकारच्या स्किमची तुलना करत आहे. हे म्हणजे सफरचंदाची तुलना संत्र्याशी करण्यासारखं आहे-हा दृष्टीकोन योग्य नाहीये.

दुस-या स्थितीमध्ये,गुंतवणुकदाराने जरी स्किममध्ये गुंतवणूक केलेली असली तरी बाजार हे एका वाईट स्थितीतून जात असतो. जेव्हा आपण वाहतुक कोंडीमध्ये अडकतो तेव्हा चालक कितीही चांगला असो किंवा गाडी कितीही उत्तम असो तुम्हाला वेगाने जाता येत नाही. असेच जेव्हा बाजाराची स्थिती चांगली नसते तेव्हा घडते. अशा परिस्थितीमध्ये, वाहतुक कोंडीमध्ये, प्रत्येकाला ती कोंडी सुटेपर्यंत थांबावेच लागते

अनेक वेळा, आपला मूल्यमापन करण्याचा दृष्टीकोन अयोग्य असल्यामुळे म्युच्युअल फंड चांगली कामगिरी करत नाहीयेत असे समजले जाते.

457
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे