अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम म्हणजे काय?

अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम म्हणजे काय?

म्युच्युअल फंड सही आहे?

अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांत गुंतवणूकदारांना अशा स्कीममध्ये फसवले गेले आहे ज्यांत इतर कुठेही मिळणार नाही असा मोठा परतावा देण्याचे वचन दिले जाते आणि जोखीम फारच कमी असे सांगितले जाते. अशा नोंदणी न केलेल्या गुंतवणूक स्कीमना पाँझी स्कीम म्हणतात आणि त्यांत फारच जास्त जोखीम असते. नोंदणी न केलेल्या गुंतवणूक स्कीम अशा डिपॉझिट स्कीम असतात ज्या काही लोकांकडून, लोकांच्या समूहाकडून किंवा एखाद्या कंपनीकडून सुरू केल्या जातात आणि भारतात सर्व प्रकारच्या डिपॉझिट स्कीमवर देखरेख ठेवणाऱ्या नऊ नियामक संस्थांपैकी एकाही संस्थेमध्ये त्यांनी नोंदणी केलेली नसते. अशा स्कीममध्ये फार मोठा परतावा देण्याचे वचन दिले जाते आणि त्यांत जोखीम नाहीच किंवा फारच कमी असल्याचे सांगितले जाते. 

अशा नोंदणी न केलेल्या डिपॉझिट स्कीममध्ये हजारो गुंतवणूकदारांचे कष्टाने मिळवलेले पैसे बुडले आहेत आणि त्यामुळेच सरकारने नोंदणी न केलेल्या डिपॉझिट स्कीमवर प्रतिबंध कायदा 2019 लागू करण्याचे ठरवले. या कायद्यामध्ये नोंदणी केलेल्या डिपॉझिट स्कीमची नावे दिलेली आहेत, तसेच गुंतवणुकीचे इतर पर्याय जसे म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा (PMS) सुद्धा आहेत ज्यांना पारंपारिक डिपॉझिट स्कीम म्हटले जात नाही.

जर आपल्याला अशी एखादी गुंतवणूक स्कीम दिसली ज्यात फार कमी जोखीम असून परतावा फार चांगला असेल, तर एक लक्षात ठेवा की परतावा आणि जोखीम यांचा एकमेकांशी फार जवळचा संबंध आहे. आजच्या जगात फुकट काहीच मिळत नाही, त्यामुळे एखाद्या गुंतवणूक स्कीममध्ये परतावा जर मोठा असेल तर त्यासंबंधी जोखीमसुद्धा मोठी असली पाहिजे. नोंदणी न केलेल्या डिपॉझिट स्कीमचे उद्दिष्ट अशा लहान गुंतवणूकदारांना फसवण्याचे असते ज्यांना जोखीम आणि परताव्याचा परस्पर संबंध कळत नाही. अशा फसवणाऱ्या स्कीममध्ये गुंतवणूकदारांना फक्त मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून लुबाडले जाते आणि त्यातील जोखमींची माहिती दिली जात नाही.

नोंदणी न केलेल्या गुंतवणुकीमध्ये सर्वात मोठी जोखीम असते की परताव्याची गॅरंटी नसते आणि स्कीमचे संचालक त्यात दिलेल्या परताव्याच्या वचनांचे पालन करणार नाहीत याचीच शक्यता फार जास्त असते. या स्कीमची नोंदणी वरील नऊ पैकी कुठल्याही नियामक संस्थेकडे केलेली नसल्यामुळे फसवले गेल्यावर आपण त्यांच्याकडे तक्रार करण्यासाठी जाऊ शकत नाही.

नोंदणी न केलेल्या डिपॉझिट स्कीमवर प्रतिबंध कायदा 2019 प्रमाणे अशा स्कीमध्ये पैसे जमा करण्यासाठी स्वीकारणे, जमा केलेले पैसे फसवणूक करून गुंतवणूकदारांना परत न करणे, एवढेच नाही तर अशा स्कीमचा प्रचार करणे सुद्धा बेकायदेशीर ठरवले गेले आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी शिक्षा केली जाते. म्हणूनच, यापुढे जर आपण एखाद्या अशा गुंतवणुक स्कीमबद्दल ऐकता जेथे जास्त परताव्याचे तुम्हाला आश्वासन दिले जाते, जे इतर ठिकाणीही मिळते आणि जोखीम अगदीच कमी असेल, आपले पैसे काही कालावधीनंतर दुप्पट करण्याचे वचन दिलेले असेल किंवा फार जास्त जोखीम न पत्करता आपल्याला दशलक्षाधीश करण्याच्या गोष्टी केलेल्या असतील, तर ही स्कीम कोण संचालित करीत आहेत, स्कीमची नोंदणी चित्रामध्ये दाखवलेल्या नियामक संस्थांपैकी एखाद्या संस्थेकडे केलेली आहे किंवा नाही हे पहा आणि या स्कीमबद्दल इतर काही माहिती किंवा बातमी मिळते का ते पहा.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे