स्टेप-अप SIP म्हणजे काय?
1 मिनिट 31 सेकंद वाचण्यासाठी

तुमच्या उत्पन्नावर, वैयक्तिक जीवनाच्या टप्प्यावर, आणि मासिक खर्चातील बदलांवर अवलंबून तुम्ही किती गुंतवणूक करू शकता, हे ठरते. महागाईला सामोरे जाण्यासाठी आणि तुमच्या उद्दिष्टांपर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी, तुमच्या गुंतवणुकीचं वाढणं महत्त्वाचं आहे.
सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा टॅक्स बचतीसाठीच्या म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा उत्तम मार्ग आहे. SIPच्या मदतीने, तुम्ही तुमच्या बजेटला योग्य अशी छोटी रक्कम नियमितपणे गुंतवू शकता, मग ती आठवड्याला, महिन्याला किंवा तिमाहीला असो. तुमची गुंतवणूक अधिक प्रभावी बनवण्यासाठी, तुम्ही एक ऑटोमेटेड फीचर वापरू शकता, ज्यामुळे तुमची गुंतवणूक ठराविक कालावधीत वाढेल.
तुम्ही हे स्टेप-अप SIPच्या मदतीने करू शकता.
स्टेप-अप सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP): एक स्टेप-अप SIP आपल्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीची रक्कम ठराविक टक्क्यांनी आपोआप वाढवते. तुमच्या करिअरच्या सुरुवातीला स्टेप-अप SIP सुरु करा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तयारी करा.
स्टेप-अप SIPचं उदाहरण: आता कल्पना करा की तुम्ही ₹20,000 या सुरुवातीच्या रकमेपासून SIP सुरू करता. प्रत्येक वर्षी, तुम्ही SIPची रक्कम 10% ने वाढवण्याचा विचार करता. स्टेप-अप SIP कसं काम करेल, ते खालीलप्रमाणे आहे:
वर्ष 1: तुम्ही ₹20,000 ने सुरुवात करता.
वर्ष 2: तुम्ही SIP 10% ने वाढवता, त्यामुळे ₹2,000 ची भर घालून ती ₹22,000 होते.
वर्ष 3: 10% वाढ कायम ठेवत, तुम्ही ₹2,200 ची भर घालून ती ₹24,200 करता.
म्हणून, तुमच्या SIPच्या रक्कमा वर्ष 1 मध्ये ₹20,000, दुसऱ्या वर्षी ₹22,000, आणि तिसऱ्या वर्षी ₹24,200 असतील.
आता तुम्ही विचार करत असाल, स्टेप-अप SIP का करावी?
स्टेप-अप SIP केल्याने तुम्हाला:
> तुमच्या उत्पन्नाच्या वाढीसोबतच जास्त गुंतवणूक करता येईल.
> महागाई आणि वाढत्या खर्चापासून तुमच्या बचतीचे संरक्षण करता येईल.
> अतिरिक्त योगदानामुळे तुमची संपत्ती जलद वाढेल.
> बदलत्या आर्थिक उद्दिष्टांसाठी तुमच्या गुंतवणुकीला समायोजित करता येईल.
> नियमित योगदानासोबत शिस्तबद्ध बचतीच्या सवयी विकसित करता येतील.
> आवश्यकतेनुसार सहजपणे तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन आणि समायोजन करता येईल.
स्टेप-अप SIP सुरू करण्याचा मार्ग:
स्टेप 1: तुमची प्रारंभिक मासिक गुंतवणूक आणि वार्षिक वाढ ठरवा.
स्टेप 2: तुमच्या निवडलेल्या म्युच्युअल फंड सोबत स्टेप-अप SIP सेट करा.
स्टेप 4: ठरल्याप्रमाणे नियमित योगदान करा.
स्टेप 5: तुमच्या उद्दिष्टांशी जुळून राहण्यासाठी तुमच्या SIPचं नियमितपणे पुनरावलोकन करा आणि समायोजित करा.
म्हणून, स्टेप-अप SIP वाढत्या उत्पन्नासाठी उत्कृष्ट आहे. यामुळे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीत हळूहळू वाढ करू शकता आणि ती एक मजबूत आर्थिक संपत्ती बनवू शकता, जसं एखादं झाड काही काळानंतर अधिक मजबूत होतं.
अस्वीकरण
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.