मला म्युच्युअल फंड्समधून माझे पैसे कसे काढता येतील?

मला म्युच्युअल फंड्समधून माझे पैसे कसे काढता येतील? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंड्सचा सर्वात मोठा फायदा आहे त्यांची लिक्विडिटी - म्हणजेच पाहिजे तेव्हा सोयीस्करपणे गुंतवणूकदारांच्या युनिट्सचे पैशांत रुपांतरण.

म्युच्युअल फंड्सचे विनियमन सेबी (SEBI), म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे केले जाते, त्यामुळे लिक्विडिटी संबंधी त्यांचे नियम फार विस्तृत आहेत. ओपन एन्ड स्किम्स, ज्याचा ब-याचशा स्किम्स समावेश असतो, त्यात लिक्विडिटी हे प्रामुख्याने दर्शवले जाणारे वैशिष्ट्य आहे. लिक्विडिटी म्हणजे एखाद्या मालमत्तेचे पैशांत रुपांतरण करण्याची सोय किंवा सुलभता.

पैसे काढून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पैसे गुंतवणूकदाराच्या सांगितलेल्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केले जातात, ते ही 3 कामकाजांच्या दिवसांच्या आत.

तरीही, आपण दोन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. पहिली म्हणजे, काही स्किम्समध्ये निर्गमन भाराचा(एक्झिट लोड) कालावधी असू शकतो. अशा वेळी, एका निश्चित कालावधीच्या, उदाहरणार्थ 3 महिने, आधी केलेल्या विक्रीवर अ‍ॅसेट व्हॅल्यूच्या काही टक्के, उदाहरणार्थ 0.5%, भार आकारला जाऊ शकतो. असा भार आकारून फंड व्यवस्थापक अल्पकालीन गुंतवणूकदारांना लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात. दुसरी गोष्ट, मालमत्ता व्यवस्थापन कंपनी किमान विक्रीची रक्कम निश्चित करू शकते. गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदारांनी स्किम संबंधी सर्व दस्तऐवज नीट वाचून घेण्याचा सल्ला दिला जातो.

458
456
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे