भविष्य सुरक्षित करण्यासाठी आरडी आणि एफडी पुरेशा नाहीत का?

भविष्य सुरक्षित करण्यासाठी आरडी आणि एफडी पुरेशा नाहीत का?

म्युच्युअल फंड सही आहे?

रेकरिंग डिपॉझिट (आरडी) आणि फिक्स डिपॉझिट (एफडी) आपल्या देशामधील बचत करण्याची फार लोकप्रिय साधने आहेत. ती साधने सुरक्षित आहेत आणि त्यात एक परताव्याच्या दराची गॅरंटी असते.

हे यावर अवलंबून असते की एखाद्या गुंतवणूकदाराला भविष्यात काय अपेक्षित आहे. जर गुंतवणूकदारांना त्यांचे भांडवल सुरक्षित ठेवायचे असेल आणि त्यावर एक निश्चित दराने बऱ्यापैकी परतावा पाहिजे असेल आणि चलनवाढीची आणि करांची चिंता नसेल, तर ही साधने चांगली आहेत. पण जर गुंतवणूकदारांना चलनवाढ आणि कर यांच्या दरापेक्षा अधिक परतावा पाहिजे असेल, तर ही साधने एवढी चांगली नाहीत.

जर गुंतवणूकदाराकडे सुरुवातीसच अधिक भांडवल असेल आणि त्यांना क्रयशक्ती वाढवण्याची काळजी नसेल, तर बचत करून मिळकत सुरू करण्यासाठी आरडी आणि एफडी सुरक्षित आणि उपयुक्त साधने आहेत. जर एखाद्या गुंतवणूकदाराला भांडवलाच्या सुरक्षिततेची आणि नियमित आणि स्थिर मिळकतीची काळजी अधिक असेल, तर एफडी आदर्श असू शकतात.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे