म्युच्युअल फंडांमधील डायरेक्ट आणि रेगुलर प्लॅन पैकी काय निवडावे?

म्युच्युअल फंडांमधील डायरेक्ट आणि रेगुलर प्लॅन पैकी काय निवडावे? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

जेव्हा आपण एखाद्या डिस्ट्रिब्यूटरच्या किंवा इतर मध्यस्थाच्या माध्यमाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता, तेव्हा आपण त्या स्किमच्या रेग्युलर प्लॅनमध्ये गुंतवणूक करता. मध्यस्थाच्या माध्यमाने गुंतवणूक करण्याचे काही फायदे आहेत. आपल्या शॉर्ट टर्म आणि दिर्घकालीन उद्दिष्टांसाठी योग्य अशा स्किमची निवड करण्यात डिस्ट्रिब्यूटर आपली मदत करू शकतात. डिस्ट्रिब्यूटर आपल्यासाठी केवायसी सारख्या प्रक्रिया पूर्ण करण्यात, तसेच एसआयपी/ एसडब्ल्यूपी/ एसटीपी सुरू करण्यात मदत करतात आणि जर आपण पहिल्यांदा गुंतवणूक करीत असलात तर फॉर्म भरण्याची कामे सुद्धा करतात.

जेव्हा आपली वित्तीय उद्दिष्टे बदलतात, किंवा जेव्हा लाभ बुक करून किंवा निवडलेले ऐसेट ऐलोकेशन(मालमत्ता वितरण) तसेच राखायचे असल्यास आपल्या पोर्टफोलिओचे रीबॅलंसिंग करायची गरज असते, तेव्हा डिस्ट्रिब्यूटर पोर्टफोलिओमध्ये बदल करून आपली मदत करतात. आपला पोर्टफोलिओ अप टू डेट आहे याची खात्री करून देण्यासाठी, गरज असेल तेव्हा पत्ता बदलणे किंवा नॉमिनी बदलणे असा आपला खाजगी तपशील अपडेट करून देण्यासाठी मध्यस्थ अशा अनेक सेवा देतात. पण जर आपण वित्तीय बाजारांचे बऱ्यापैकी जाणकार आहात, निरनिराळ्या प्रकारच्या म्युच्युअल फंड स्किमबद्दल आपल्याला माहिती आहे, स्किमचे प्रदर्शन कसे पडताळून पाहावे, गुंतवणुकीचे उद्दिष्ट काय, फंडस्च्या जोखमीतील घटक आणि त्यांचे पोर्टफोलिओ, आपल्या वित्तीय उद्दिष्टांसाठी कुठल्या प्रकारचा फंड उत्तम आहे इत्यादी बाबींची आपल्याला माहिती असल्यास आपण डायरेक्ट प्लॅनच्या माध्यमाने गुंतवणूक करू शकता.

जर आपण ऑनलाइन गुंतवणूक आरामात करू शकता, आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता, एसआयपीसाठी ईसीएस डेबिट सेट अप करू शकता, तर आपण म्युच्युअल फंडमध्ये डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्याबद्दल नक्कीच विचार करू शकता.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे